पूर्व पत्नीने मित्रासह पतीच्या घरात घुसून केली सासरच्यांना मारहाण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 22, 2018 11:20 PM2018-07-22T23:20:14+5:302018-07-22T23:25:20+5:30

नाशिक: पूर्व पत्नीने मित्रासह पतीच्या घरात घुसून पतीसह सासरच्यांना अश्लील शिवीगाळ व मारहाण करून घराचे नुकसान केल्याची घटना सिडकोतील लेखानगरमध्ये शुक्रवारी (दि़२०) सांयकाळी घडली़

nashik,ex-wife,beat,husband | पूर्व पत्नीने मित्रासह पतीच्या घरात घुसून केली सासरच्यांना मारहाण

पूर्व पत्नीने मित्रासह पतीच्या घरात घुसून केली सासरच्यांना मारहाण

Next
ठळक मुद्दे दरवाज्यावर व काचेच्या खिडकीवर फेकल्या विटादुचाकीवर विटा फेकून नुकसान

नाशिक: पूर्व पत्नीने मित्रासह पतीच्या घरात घुसून पतीसह सासरच्यांना अश्लील शिवीगाळ व मारहाण करून घराचे नुकसान केल्याची घटना सिडकोतील लेखानगरमध्ये शुक्रवारी (दि़२०) सांयकाळी घडली़

पंडित काळे (वय ३८, रा़ सावरकर चौक, लेखानगर, सिडको) यांनी अंबड पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीनुसार त्यांनी पूर्व पत्नी संशयित शीतल सैंदाणे (रा़ राणेनगर) या मित्र वैभव कुमावत (रा़ राणाप्रताप चौक, सिडको) हे दोघे रात्री ८.३० वाजेच्या सुमारास बळजबरीने घरात घुसले़ त्यांनी पंडित शेळके यांची आई कौशल्याबाई व भाऊ ज्ञानेश्वर यांना अश्लील शिवीगाळ करून मारहाण केली़

यानंतर घराच्या दरवाज्यावर व काचेच्या खिडकीवर विटा फेकल्या तसेच घराबाहेर लावलेल्या दुचाकीवर विटा फेकून नुकसान केले़, तर संशयित वैभव कुमावत याने लोखंडी नळाच्या पाइपने पंडित काळे यांच्या डोक्यास मारहाण करून दुखापत केली़
याप्रकरणी अंबड पोलीस ठाण्यात दोघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे़

Web Title: nashik,ex-wife,beat,husband

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.