‘ड्राय डे’ला साडेसहा लाखांचा मुद्देमाल जप्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 26, 2018 06:40 PM2018-06-26T18:40:27+5:302018-06-26T18:43:31+5:30
नाशिक : विधानपरिषदेच्या शिक्षक आमदार निवडणुक मतदानामुळे सोमवारी (दि़२५) ड्राय-डे घोषीत करण्यात आला होता़ या पार्श्वभूमीवर राज्य उत्पादन शुल्क विभागाने सोमवारी जिल्ह्यातील विविध २४ ठिकाणी छापेमारी तसेच नाकाबंदी करून स्विफ्ट डिझायर व मारुती अल्टो या दोन चारचाकी वाहनांसह महाराष्ट्रात विक्रीसाठी बंदी असलेले तसेच दादरा नगर हवेली निर्मित ६ लाख ४० हजार १५५ रुपयांचा अवैध मद्यसाठा जप्त केला़

शिक्षक मतदार संघासाठी सोमवारी मतदान होणार असल्याने ड्राय डे घोषीत करण्यात आला होता़ उत्पादन शुल्क विभागाने विविध २४ ठिकाणी छापेमारी केली़ महाराष्ट्रात प्रतिबंधीत असलेली व केवळ दादरा नगर हवेली येथे विक्रीस मान्यता असलेले मद्य स्विफ्ट डिझायर (एमएच ०४ इएक्स ५४२०) कारच्या डिक्कीतून जप्त केले़ त्यामध्ये प्राईड व्हिस्कीच्या ४८ बाटल्या, मॅकडॉवेलच्या ९६ बाटल्या रॉयल स्टॅग व्हिस्कीच्या ४८ बाटल्या इम्पीरियल ब्ल्यु व्हिस्कीच्या १४४ बाटल्या, किंगफिशर बिअरच्या २१६ टिन, टयुबर्ग बिअरच्या ७२ टीन असा ९५ हजार ५३५ रुपयांचा मुद्देमाल जप्त केला़
याबरोबरच पंचवटीतील फुलेनगर परिसरातून राज्य उत्पादन शुल्काच्या भरारी पथकाने एक हजार २०० लिटर गावठी दारुचा साठाी जप्त केला़ उपायुक्त प्रसाद सुर्वे, जिल्हा अधीक्षक सी.बी. राजपूत यांच्या मार्गदर्शनाखाली निरीक्षक एस. बी. चोपडेकर, सी.पी. निकम, एम.एम. राख, राजेंद्र धनवटे, जे. एस. जाखेरे, प्रवीण मंडलिक, अरुण सुत्रावे, देवदत्त पोटे, चंद्रकांत पाटील, शिवाजी चव्हाणके, प्रवीण ठाकरे, शाम पानसरे, सुनील दिघोळे, विष्णू सानप, विरेंद्र वाघ, विलास कुवर, सुनील पाटील, प्रवीण अस्वले, रोहीत गांगुर्डे, सोन्याबापू माने, रतिलाल पाटील, सोमनाथ भांगरे, धनराज पवार, पूनम भालेराव यांच्या पथकाने ही कामगिरी केली़