बनावट औषधांद्वारे रुग्ण व नागरिकांच्या जिवाशी खेळणाऱ्या डॉक्टरविरोधात गुन्हा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 15, 2018 05:06 PM2018-05-15T17:06:42+5:302018-05-15T19:17:56+5:30
नाशिक : परवाना नसताना बनावट औषधे तयार करून त्यांची विक्री करून रुग्ण व नागरिकांच्या जिवाशी खेळणा-या आयुर्वेदिक डॉक्टरविरोधात पंचवटी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे़ संशयित वीरेंद्र कुमारनसिंग गिरासे (रा. पेठकर प्लाझा, मखमलाबाद नाका, पंचवटी, नाशिक) असे गुन्हा दाखल झालेल्या डॉक्टरचे नाव आहे़ त्यांचे पंचवटी परिसरातील मखमलाबाद नाक्यावर असलेल्या पेठकर प्लाझामध्ये ऊर्जा आयुर्वेदिक क्लिनिक आहे़

अन्न व औषध प्रशासनाचे निरीक्षक जीवन जाधव (दुर्गानगर, त्रिमूर्ती चौक, सिडको, नाशिक) यांनी पंचवटी पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीनुसार डॉ़ विरेंद्र गिरासे यांनी बी़ए़एम़एस.ची पदवी धारण केलेली आहे़ पंचवटीतील पेठकर प्लाझामध्ये गिरासे यांचे ऊर्जा आयुर्वेदिक क्लिनिक असून, त्यांनी आयुर्वेदिक औषधामध्ये अॅलोपॅथीची औषधे टाकून रुग्णांना व नागरिकांना या औषधांची विक्री केली. विशेष म्हणजे त्यांच्याकडे औषधे बनविण्याची कोणतीही परवानगी नाही़ अन्न वऔषध प्रशासनाने फेब्रुवारीमध्ये ऊर्जा आयुर्वेदिक क्लिनिकवर छापा टाकला होता़ या छाप्यात आढळून आलेली बनावट औषधे जप्त करून ती तपासणीसाठी पाठविली होती़
अन्न व औषध प्रशासनाने तपासणीसाठी जप्त केलेल्या औषधांचा अहवाल प्राप्त झाला असून ते बनावट असल्याचे निष्पन्न झाले़ त्यानुसार निरीक्षक जाधव पंचवटी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली़ त्यामध्ये या क्लिनिकमध्ये अॅलॉपॅथिक घटकांच्या द्रव्याचे मिश्रण तयार करून त्यापासून बनावट औषधे तयार केली़ तसेच ही बनावट औषधे रुग्णांना तसेच सर्वसामान्य नागरिकांना विकल्याने त्यांच्या आरोग्यास धोका पोहोचेल अशा पद्धतीचे कृत्य केले़ या प्रकरणी पंचवटी पोलिसांनी डॉ़गिरासे यांच्याविरोधात औषधे व सौंदर्यप्रसाधने कायद्यान्वये गुन्हा दाखल केला आहे.