गोंदे दुमालात सामूहिक शेतीच्या वादातून दगडफेक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 27, 2018 06:22 PM2018-06-27T18:22:51+5:302018-06-27T18:22:55+5:30
नाशिक : सामूहिक शेतजमिनीच्या वादातून एका गटाने दुसऱ्या गटातील घरावर दगडफेक करून चार-पाच जणांना बेदम मारहाण केल्याची घटना मंगळवारी (दि़२६) पहाटेच्या सुमारास इगतपुरीतील गोंदे दुमाला येथे घडली़ यामध्ये गंभीर जखमी झालेल्यांवर जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

वाडीव-हे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार गोंदे दुमाला येथील रंगनाथ तुकाराम नाठे यांची गोंदे शिवारातील मौजे डोफर कंपनीजवळ वडिलोपार्जित सामूहिक शेती आहे़ त्यांचे चुलते संशयित सुरेश व पांडू केरू नाठे यांनी त्यांची शेती वडिलांच्या नावावर असताना तिची विक्री संजय अमृता नाठे यांच्या मदतीने परस्पर करून पैसे स्वीकारल्याने रंगनाथ नाठे व सुरेश नाठे यांच्यामध्ये वाद आहे.
मंगळवारी सायंकाळी साडेसात वाजेच्या सुमारास संशयित संजय अमृता नाठे, महेश संजय नाठे, परमेश्वर अमृता नाठे, सोनू समाधान नाठे, गणेश समाधान नाठे, महेश नाठे यांचा मोठा भाऊ (सर्व रा. गोंदे दुमाला, ता. इगतपुरी, जि. नाशिक) यांनी रंगनाथ नाठे यांच्या घरावर दगडफेक करून घरातील सदस्यांना जबर मारहाण केली़ यामध्ये रंगनाथ नाठे, सुनील नाठे, पार्वताबाई नाठे व अनिल नाठे व तुकाराम नाठे हे जखमी झाले असून, त्यांच्यावर जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत़
या प्रकरणी रंगनाथ नाठे यांनी वाडीव-हे पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे़