चोरट्यांसोबतच्या झटापटीत जखमी झालेल्या युवतीच्या आईचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 20, 2018 02:19 PM2018-03-20T14:19:51+5:302018-03-20T17:59:59+5:30

नाशिक : सहा दिवसांपुर्वी बँकेतून काढलेल्या दोन लाख रुपयांची लूट करणाऱ्या दोघांचा दुचाकीवरून पाठलाग करून चोरट्यांकडून पैशांची बॅग परत मिळवितांना नासर्डी पुलावर झालेल्या झटापटीत दुचाकीवरून खाली पडल्याने गंभीर जखमी झालेल्या रणरागिणीच्या आईचा मंगळवारी (दि़२०) सकाळी उपचारादरम्यान मृत्यू झाला़ शीला चंद्रशेखर गायकवाड (फ्लॅट नंबर १२०१, पार्कसाईड, रेसिडेन्सी, नाशिक) असे मृत्यू झालेल्या महिलेचे नाव आहे़

nashik,fighting,thieves,injured,women,Death | चोरट्यांसोबतच्या झटापटीत जखमी झालेल्या युवतीच्या आईचा मृत्यू

चोरट्यांसोबतच्या झटापटीत जखमी झालेल्या युवतीच्या आईचा मृत्यू

Next
ठळक मुद्दे नासर्डीपुलावरील घटना : चोरट्यांसोबत झटापटसात दिवस मृत्युशी झुंज ; उपचारादरम्यान मृत्यू

नाशिक : सहा दिवसांपुर्वी बँकेतून काढलेल्या दोन लाख रुपयांची लूट करणाऱ्या दोघांचा दुचाकीवरून पाठलाग करून चोरट्यांकडून पैशांची बॅग परत मिळवितांना नासर्डी पुलावर झालेल्या झटापटीत दुचाकीवरून खाली पडल्याने गंभीर जखमी झालेल्या रणरागिणीच्या आईचा मंगळवारी (दि़२०) सकाळी उपचारादरम्यान मृत्यू झाला़ शीला चंद्रशेखर गायकवाड (फ्लॅट नंबर १२०१, पार्कसाईड, रेसिडेन्सी, नाशिक) असे मृत्यू झालेल्या महिलेचे नाव आहे़ या प्रकरणी मुंबई नाका पोलीस ठाण्यात चोरट्यांविरोधात दाखल करण्यात आलेल्या गुन्ह्यांमध्ये अतिरिक्त कलम वाढविण्यात आले आहे़

पार्कसाईड रेसिडेन्सीतील रहिवासी शीला गायकवाड या १४ मार्च २०१८ रोजी मुलगी तक्षशिलासोबत नाशिक- पुणे रोडवरील स्टेट बँक आॅफ इंडियात पैसे काढण्यासाठी गेल्या होत्या़ दुपारी साडेबारा वाजेच्या सुमारास बँकेतून काढलेले दोन लाख रुपये बॅगेत ठेवून यामाहा फसीनो दुचाकीवरून (एमएच १५, एफआय ००६१) तक्षशिलासोबत घरी जात असताना पाळतीवर असलेल्या पल्सर दुचाकीवरील दोन संशयितांनी नासर्डी पुलाजवळ शीला गायकवाड यांच्या हातातील पैशांची बॅग हिसकावली़ यावेळी हातास बसलेल्या झटक्याने शीला गायकवाड या दुचाकीवरून खाली कोसळल्याने त्यांच्या डोक्यास गंभीर दुखापत झाली़

यावेळी दुचाकी चालवत असलेल्या तक्षशिला गायकवाड (२८) हिने स्वत:चा तोल सावरला आणि चोरट्याचा पाठलाग केला़ यानंतर अतिशय धाडसाने चोरट्यांच्या हातातील पैशांची बॅग झटापट करून पुन्हा ताब्यात घेतली. या झटापटीत चोरट्यांच्या दुचाकीचा क्रमांक पाहाता आला नाही तर नागरिकांच्या गर्दीमुळे दोघा चोरट्यांनी दुचाकीवरून तत्काळ पळ काढला. यानंतर तक्षशिला यांनी आपल्या जखमी आईला उपचारासाठी जवळील रुग्णालयात दाखल केले व मुंबई नाका पोलीस ठाण्यात जाऊन फिर्याद दिली़ या प्रकरणी जबरी लुटीचा व अपघातास कारणीभूत ठरल्याचा गुन्हा संशयित चोरट्याविरुद्ध दाखल केला़

सात दिवस मृत्युशी झुंज
मुलीच्या मागे दुचाकीवर बसलेल्या शिला गायकवाड यांच्या हातातील पैशांची बॅग चोरटे हिसकावत असताना त्यांनी प्रतिकार केला़ मात्र, चोरट्यांनी दिलेल्या जोरदार झटक्यामुळे बॅग खेचण्यात चोरटे यशस्वी झाले तर शिला या दुचाकीवरून खाली पडल्याने डोक्यास गंभीर मार लागला़ त्यांच्यावर खासगी रुग्णालयात १४ मार्चपासून उपचार सुरू होते़ मंगळवारी (दि़२०) सकाळच्या सुमारास शिला गायकवाड यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला़


सीसीटीव्ही फुटेज हाती
गत बुधवारी लुटारुंसोबत झालेल्या झटापटीत जखमी झालेल्या शिला गायकवाड यांचा मंगळवारी सकाळी मृत्यू झाला़ या चोरटयांपैकी एकाचे सीसीटीव्ही फुटेज आमच्या हाती लागले असून या दोघांचाही शोध सुरू आहे़ दरम्यान, या दोघांवर दाखल असलेल्या गुन्ह्यात अतिरिक्त कलम वाढविण्यात आले आहे़
-सुनील नंदवाळकर, वरीष्ठ पोलीस निरीक्षक, मुंबई नाका पोलीस ठाणे

Web Title: nashik,fighting,thieves,injured,women,Death

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.