अखेरीस सुर्वे वाचनालय झाले खुूले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 15, 2019 07:02 PM2019-05-15T19:02:01+5:302019-05-15T19:03:43+5:30
नाशिक : मागील आठवड्यात महापालीकेच्या सिडको विभागीय कार्यालयाच्या वतीने त्यांच्या ताब्यातील अभ्यासिका,वाचनालय तसेच इतर मिळकती सील करण्याची कारवाई करण्यात ...
नाशिक: मागील आठवड्यात महापालीकेच्या सिडको विभागीय कार्यालयाच्या वतीने त्यांच्या ताब्यातील अभ्यासिका,वाचनालय तसेच इतर मिळकती सील करण्याची कारवाई करण्यात आली असतांना यात अश्विननगर येथील कविवर्य नारायन सुर्वे वाचनालयालाही सील लावण्यात आले होते. यामूळे सर्वत्र नाराजी परसरली असतांना अखेरीस मनपाने वाचनालयाचे दार उघडे केले.
महापालीकेच्या वतीने उच्च न्यायालयात दाखल करण्यात आलेल्या जनहीत याचिकेच्या आधारे मनपाने नशिक शहरासह सिडको भागातील त्यांच्या ताब्यातील अभ्यासिका,वाचनालय,समाजमंदिर,व्यायमशाळा तसेच धार्मिक मंदिरे देखील सील करण्याची मोहीम राबविली. या मोहीमेमूळे सिडको भागासह सर्वत्र मनपाच्या विरोधात मोंठ्या प्रमाणात वादंग निर्माण झाले होते. याबाबत सिडको भागातील राजकीय पक्ष व सामाजिक संघटेनेच्या वतीने निषेधही नोदविण्यात आला होत.यानंतर काही प्रमाणात मनपाने याकडे नरमाईची भुमिका घेतली. परंतू ज्या मिळकती मनपाने सील केल्या आहेत त्या मिळकतींना रेडीरेकणार नुसार भाडे आकारण्याचा घाट घातला असुन यास सर्वांनी कडाडून विरोध केला जात आहे. यात मनपाने अश्विननगर येथील कविवर्य नारायन सुर्वे सार्वजनिक वाचनालय देखील सील केले असल्याने सिडकोवासियांमध्ंये नाराजी व्यक्त केली होती. अखेरीस मनपाने काही अटी-शर्तीच्या आधारे सुर्वे वाचनालय खुले करण्यात आले आहे.
अश्विनगर येथील सुर्वे वाचनालयात सुर्वे यांना मिळालेले जनस्थान,पदमश्री,संत कबिर यांच्यासह २५० हून अधिक पुरस्कार आहे. तसेच ३० हजारहून अधिक ग्रंथ संपदा याबरोबरच आरोग्य वैद्यकीय मदत केंद्र ,विविध कोर्सेसचे मोफत ट्रेनिगं सेंटर आदी सुविधा याठिकाणी आहे.