मालेगावातील चार उपविभागांचे अखेर खासगीकरण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 1, 2020 08:30 PM2020-03-01T20:30:23+5:302020-03-01T20:31:17+5:30
नाशिक : मालेगावमधील काही भागांतील वीजपुरवठा आणि विजबिल वसुलीसंदर्भातील जबाबदारी आणि एका खासगी कंपनीला देण्यात आलेली आहे. विजेसंदर्भातील कोणत्याही ...
नाशिक : मालेगावमधील काही भागांतील वीजपुरवठा आणि विजबिल वसुलीसंदर्भातील जबाबदारी आणि एका खासगी कंपनीला देण्यात आलेली आहे. विजेसंदर्भातील कोणत्याही अडचणी संबंधित कंपनीच्या आधीन राहणार असून, महावितरण केवळ मध्यस्थाची भूमिका बजावणार आहे. गेल्या अनेक महिन्यांपासून मालेगावच्या वीज वितरणप्रणालीच्या खासगीकरणाचा चर्चा सुरू होती. १ मार्चपासून प्रत्यक्ष कार्यवाहीस सुरुवातही झाली आहे.
ग्राहकांना तत्पवर, उच्च दर्जाची सेवा मिळावी यासाठी खासगी कंपन्यांकडेन विजेसंदर्भातील सर्व जबाबदारी देण्यात आल्याचे महावितरणकडून सांगण्यात आले असले तरी वीजबिल वसुलीत येणाऱ्या अडचणी लक्षात घेऊन खासगी कंपनीकडे येथील कारभार सुपूर्द करण्यात आल्याची चर्चा आहे. मालेगाव शहरातील उपविभाग क्रमांक १, २ आणि ३ तसेच मालेगाव ग्रामीण उपविभागात येणारे भोयेगाव, सायनी, दरेगाव, मालदे तसेच द्याने या गावांसाठी कोलकाता इलेक्ट्रिक सप्लाय कार्पोरेशन लिमिटेड या कंपनीत फ्रॅन्चायझी म्हणून नेमणूक करण्यात आली आहे.
फ्रॅन्चायझी देण्यात आली असली तरी ग्राहक हे महावितरणचेच राहणार असून, राज्यातील इतर ग्राहकांना लागू असणाºया प्रचलित नियमाप्रमाणेच संबंधित फ्र्रॅन्चायझी ग्राहकांना सेवा देणार असल्याचा दावा महावितरणने केला आहे.