कत्तलीसाठीच्या पाच जनावरांची सुटका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 20, 2018 05:38 PM2018-06-20T17:38:10+5:302018-06-20T17:38:10+5:30
नाशिक : कत्तलीसाठी घेऊन जाणाऱ्या पाच जनावरांची इंदिरानगर पोलिसांनी बुधवारी (दि़२०) सकाळी सुटका केली़ जनावरांची चोरटी वाहतूक करणाºया एका संशयितास पोलिसांनी अटक केली असून, त्याच्याकडून सुमारे दोन लाखाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे़
नाशिक : कत्तलीसाठी घेऊन जाणाऱ्या पाच जनावरांची इंदिरानगर पोलिसांनी बुधवारी (दि़२०) सकाळी सुटका केली़ जनावरांची चोरटी वाहतूक करणा-या एका संशयितास पोलिसांनी अटक केली असून, त्याच्याकडून सुमारे दोन लाखाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे़
इंदिरानगर पोलीस ठाण्यातील गुन्हे शोध पथकाचे पोलीस उपनिरीक्षक रोहित शिंदे यांना वडाळागावातील मांगीरबाबा चौकातून कत्तलीसाठी जनावरे नेणार असल्याची माहिती मिळाली होती़ त्यांनी पोलीस उपनिरीक्षक विकास लोंढे यांना माहिती दिल्यानंतर सकाळी सात वाजेपासून मांगीरबाबा चौकात पोलीस कर्मचारी सानप, शेख, शिरसाट, सोनार यांनी सापळा रचला़ पोलिसांनी मिळालेल्या माहितीनुसार संशयित छोटा हत्ती टेम्पोचालक (एमएच ०३, एएन ४०७५) संशयित आरोपी सद्दाम अन्वर पाटकरी (२६, रा. भद्रकाली) याची चौकशी केली असता त्याने उडवाउडवीची उत्तरे दिली़
पोलिसांनी या टेम्पोचे शटर उघडले असता त्यामध्ये जिवंत तीन गाई व दोन गो-हे आढळून आले़ पोलिसांनी संशयित पाटकरीची चौकशी केली असता त्याने छोटू कुरेशी आणि राजा कुरेशी यांच्या सांगण्यावरून ही वाहतूक केल्याचे सांगितले़ पोलिसांनी जनावरे व टेम्पो असा सुमारे दोन लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला असून, संशयितांवर गुन्हा दाखल केला आह़े