२५० पदांसाठी पाच हजार परिक्षार्थी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 16, 2019 07:06 PM2019-06-16T19:06:25+5:302019-06-16T19:07:01+5:30
नाशिक : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्यावतीने विविध प्रकारच्या तीन विभागांसाठी घेण्यात आलेल्या पुर्व परिक्षेत जिल्ह्यातून पाच हजारापेक्षा जास्त विद्यार्थ्यानी परिक्षा ...
नाशिक : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्यावतीने विविध प्रकारच्या तीन विभागांसाठी घेण्यात आलेल्या पुर्व परिक्षेत जिल्ह्यातून पाच हजारापेक्षा जास्त विद्यार्थ्यानी परिक्षा दिली. २५० पदांसांठी घेण्यात आलेल्या या परिक्षेत यंदा अनुपस्थित राहाणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या तुलनेत कमी होती. वर्ग तीन आणि चार साठी सर्वाधिक परिक्षार्थी असल्यामुळे प्रश्नपत्रिकांची काठिण्य पातळी अत्यंत कमी होती त्यामुळे परीक्षा देऊन आलेले विद्यार्थी आनंदीत दिसत होते.
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्यावतीने रविवारी सकाळी जिल्ह्यातील परिक्षा केंद्रांवर ही परिक्षा घेण्यात आली. कर सहायक, उत्पादन शुल्क निरिक्षक आणि लिपिक टंकलेखक म्हणून २५० पदांसाठी सदर परीक्षा घेण्यात आली. यंदा विचारण्यात आलेले प्रश्न फारसे अवघड नसल्यामुळे पेपर समाधानकारक सोडविल्याची भावना अनेक विद्यार्थ्यांनी व्यक्त केलीया परीक्षेत जिल्ह्यातून ७००८ विद्यार्थी प्रविष्ट झाले . होते. मात्र प्रत्यक्षात ५८१९ विद्यार्थ्यांनी परिक्षा दिली.