कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षकांचे धरणे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 18, 2019 04:53 PM2019-01-18T16:53:35+5:302019-01-18T16:54:32+5:30

नाशिक : राज्यभरातील कनिष्ठ महाविद्यलयीन शिक्षकांच्या मागण्या दिर्घकाळापासून प्रलंबित असल्याने कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षकांच्या संघटनेने आता आंदोलनात्मक पवित्रा घेतला असून ...

nashik,for,imposing,junior,college,teachers | कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षकांचे धरणे

कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षकांचे धरणे

Next
ठळक मुद्देविविध मागण्या: जूनी पेन्शन योजना लागू करण्याची मागणी

नाशिक: राज्यभरातील कनिष्ठ महाविद्यलयीन शिक्षकांच्या मागण्या दिर्घकाळापासून प्रलंबित असल्याने कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षकांच्या संघटनेने आता आंदोलनात्मक पवित्रा घेतला असून जिल्ह्यात प्रत्येक तहसिल कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात येत अ ाहे. शहरात गोल्फ क्लब मैदान येथे शिक्षकांनी धरणे आंदोलन केले.
कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षकांना केंद्र शासनाप्रमाणे जुनी पेन्शन योजना लागू करण्याच्या मागणीसह सर्व आश्वासित व मान्य मागण्यांची पूर्तता आणि अंमलबजावणीसाठी कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक संघटनेने आंदोलन सुरू केले आहे. आंदोलनाचा हा पहिला टप्पा असून शिक्षकांच्या प्रलंबित मागण्यांच्या पूर्ततेसाठी धरणे आंदोलन आणि त्यानंतर २३ जानेवारीला तीव्र आंदोलन करण्याचा इशाराही या निवेदनाच्या माध्यमातून देण्यात आला आहे.
कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षकांच्या मागण्यासंदर्भात गेल्या साडेचार वर्षात शिक्षण मंत्र्यांकडेन अनेक बैठका झाल्या आहेत. मात्र आश्वासनापलिकडे काहीही मिळालेले नाह. राज्यभरातील कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षकांच्या मागण्या दीर्घकाळ प्रलंबित असून, त्यांच्या पूर्ततेसाठी महाराष्टÑ राज्य कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक महासंघाने अनेक आंदोलने केली आहेत. ३१ डिसेंबर २०१८ पर्यंत सदर मागण्या मार्गी लावण्याचे देण्यात आलेले आश्वासन शासनाने पाळलेले नाही असे असतांना २१ डिसेंबर २०१८ रोजी वरिष्ठ व निवडश्रेणी प्रशिक्षणाबाबतचा अन्यायकारक शासन आदेश काढण्यात आला असे निवेदनात म्हटले आहे. यावेळी संघटनेचे अध्यक्ष प्रा. संजय शिंदे, सचिव अनिल महाजन यांच्यासह अन्य ादाधिकारी उपस्थित होते.

Web Title: nashik,for,imposing,junior,college,teachers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.