मनोरंजनातून अॅनिमिया जनजागृतीसाठी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 11, 2019 06:26 PM2019-04-11T18:26:26+5:302019-04-11T18:27:30+5:30
नाशिक : अॅनिमिया या आजाराविषयी लोकांमध्ये जागरूकता निर्माण व्हावी मनोरंजनाच्या माध्यमातून गोवर्धन येथे जनजागृती शिबीर घेण्यात आले. यामध्ये महिलांना ...
नाशिक: अॅनिमिया या आजाराविषयी लोकांमध्ये जागरूकता निर्माण व्हावी मनोरंजनाच्या माध्यमातून गोवर्धन येथे जनजागृती शिबीर घेण्यात आले. यामध्ये महिलांना या आजाराविषयी सप्रयोग मार्गदर्शन करण्यात आले.
गोवर्धन आरोग्य उपकेंद्र, कुटूंबकल्याण केंद्र तसेच प्रशिक्षण केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने अॅनिमिया जनाजगृती मोहिम राबविली जात आहे. अॅनिमिया मुक्त भारत कार्यक्र मा अंतर्गत या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्र माचे उद्घाटन डॉक्टर पट्टणशेट्टी यांच्या हस्ते करण्यात आले . यावेळी अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.दावल साळवे तसेच वैद्यकीय अधिकारी डॉ. भालेराव डॉ. किरण बकरे, संख्याकी अधिकारी सूर्यवंशी, श्रीमती अर्चना जोशी , प्रशांत केळकर इत्यादी मान्यवर उपस्थित होते.
याउपक्रमांतर्गत लाभार्थींना हस्त पत्रिका वाटून माहिती देणे , पोस्टर प्रदर्शन ,सापशिडी खेळाच्या माध्यमातून प्रश्नमंजुषा चित्र माहितीच्या आधारे अॅनिमिया विषयी माहिती देणे , लोककलेचे माध्यम भारूड सादर करून जनजागृती करण्यात आली. याप्रसंगी आहाराचे प्रदर्शन भरवण्यात आले होते. उपस्थितांना अॅनिमिया या आजाराविषयी माहिती देऊन वेगवेगळ्या माध्यमांचा वापर करून जनजागृती करण्यात आली.
सह संचालक डॉ पट्टणशेट्टी यांनी या कार्यक्र माचे महत्त्व विशद केले व अॅनिमिया विषयी माहिती घेऊन लोकांनी आपल्या आहारामध्ये विहारांमध्ये बदल करावा, किशोरवयीन मुलांनी आपल्या आहाराकडे लक्ष द्यावे गरोदर मातांनी आपल्या आहाराकडे लक्ष द्यावे व आपला आहार चौरंगी कसा होईल व आपल्या बाळाची वाढ चांगल्या प्रकारे साधावयाचा असेल तर अशा प्रकारच्या कार्यक्र माची नितांत गरज असते असे सांगितले. पुढील दोन दिवस गोवर्धन येथील समाज मंदिर व जलालपूर येथील समाज मंदिरामध्ये कार्यक्र माचे आयोजन करण्यात आले आहे. कार्यक्र मासाठी आशा गटप्रवर्तक आरोग्यसेविका सेवक आरोग्य सहाय्यक सहाय्यक यांनी विशेष प्रयत्न केले.