नाशिक जिल्ह्यातील चार ग्रामपंचायतींचे पाणी नमुने दूषित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 23, 2018 10:09 PM2018-02-23T22:09:05+5:302018-02-23T22:09:57+5:30

गेल्या तीन महिन्यांपासून जिल्ह्यातील चार ग्रामपंचायतींचे पाणी नमुने सातत्याने दूषित येत असल्याने या चारही तालुक्यांच्या गटविकास अधिकाऱ्यांना मुख्य कार्यकारी अधिकारी नरेश गिते यांनी नोटिसा बजावल्या आहेत. पाण्यासारख्या महत्त्वाच्या विषयावर दुर्लक्ष केल्यामुळे नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे.

nashik,four,grampanchayat, water,samples,contaminated | नाशिक जिल्ह्यातील चार ग्रामपंचायतींचे पाणी नमुने दूषित

नाशिक जिल्ह्यातील चार ग्रामपंचायतींचे पाणी नमुने दूषित

Next
ठळक मुद्देग्रामपंचायत अधिनियमानुसार संबंधितांवर कारवाई करण्याचा इशारा३ तालुक्यांमधील पाण्याचे स्रोत मध्यम प्रमाणात जोखमीचे

नाशिक : गेल्या तीन महिन्यांपासून जिल्ह्यातील चार ग्रामपंचायतींचे पाणी नमुने सातत्याने दूषित येत असल्याने या चारही तालुक्यांच्या गटविकास अधिकाऱ्यांना मुख्य कार्यकारी अधिकारी नरेश गिते यांनी नोटिसा बजावल्या आहेत. पाण्यासारख्या महत्त्वाच्या विषयावर दुर्लक्ष केल्यामुळे नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. यात सुधारणा झाली नाही तर ग्रामपंचायत अधिनियमानुसार संबंधितांवर कारवाई करण्याचा इशारादेखील गिते यांनी दिला आहे.
जिल्हा पाणी व स्वच्छता तसेच आरोग्य विभागाच्या वतीने दर महिन्याला पाण्याचे नमुने घेतले जातात. जानेवारीच्या अहवालावरून जिल्ह्यातील नऊ टक्के पाणी नमुने हे दूषित असून, याबाबत गटविकास अधिकाऱ्यांना नोटिसा बजावण्यात आल्या आहेत. यामध्ये बागलाण तालुक्यातील डांगसौंदाणे, देवळा तालुक्यातील लोहणेर व खालप तसेच निफाड तालुक्यातील चांदोरी या चार ग्रामपंचायतींचे पाणी नमुने सतत तीन महिन्यांपासून दूषित आढळून आले आहेत. जानेवारी महिन्यात तपासण्यात आलेल्या १५०३ पाणी नमुन्यांपैकी १४० पाणी नमुने दूषित आले आहेत. याबाबत संबंधित गटविकास अधिकाऱ्यांना नोटिसा देण्यात आल्या आहेत. या ग्रामपंचायतींनी पाणी शुद्धिकरणाबाबत वेळीच लक्ष न दिल्यास जबाबदार असणाºया सर्व संबंधितांवर कारवाई करण्याचा इशारा गिते यांनी दिला आहे.
दरम्यान, जिल्हा पाणी व स्वच्छता व आरोग्य विभागाच्या वतीने करण्यात येणाऱ्यां स्वच्छता सर्वेक्षणात पाण्याचे स्रोत तीव्र जोखमीचे असलेल्या जिल्ह्यातील तीन ग्रापपंचायतींना लाल कार्ड देण्यात आले आहे. यामध्ये इगतपुरी तालुक्यातील नांदगाव सदो व कळवण तालुक्यातील वडाळा व सप्तशृंगगड या ग्रामपंचायतींचा समावेश आहे. याबाबतदेखील संबंधितांना नोटिसा बजावण्यात आलेल्या आहेत, तर १३ तालुक्यांमधील पाण्याचे स्रोत मध्यम प्रमाणात जोखमीचे आहेत. असे असले तरी या स्रोतांवर लक्ष केंद्रित करण्याच्या सूचनादेखील देण्यात आल्या आहेत.

Web Title: nashik,four,grampanchayat, water,samples,contaminated

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.