कोरोना बाधिताशी संबधित चार रूग्ण निगेटिव्ह
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 8, 2020 04:16 PM2020-04-08T16:16:50+5:302020-04-08T16:17:57+5:30
नाशिक : नाशिक जिल्ह्यातील दुसरा कोराना रूग्ण नाशिक शहरातील मध्यवर्ती भागातील रहिवासी असल्याने विषाणुचा प्रार्दुभाव झपाट्याने होण्याचा धोका अधिक ...
नाशिक: नाशिक जिल्ह्यातील दुसरा कोराना रूग्ण नाशिक शहरातील मध्यवर्ती भागातील रहिवासी असल्याने विषाणुचा प्रार्दुभाव झपाट्याने होण्याचा धोका अधिक असल्याचे बोलले जात असतांना दुसऱ्या कोरानाबाधित रूग्णाशी संबंधित पाच नातेवाईकांपैकी चार रूग्णांचे स्वॉब निगेटिव्ह आले आहेत. या अहवालामुळे जिल्हा प्रशासनाला काहीसा दिलासा मिळाला असून आणखी एका रूग्ण नातेवाईकाच्या अहवालाची मात्र प्रतिक्षा आहे.
नाशिक जिल्ह्यात सध्या करोनाबाधित रूग्णांची संख्या दोन असून यो दोन्ही रूग्णांची प्रकृती स्थिर आहे. औषधोपचाराला त्यांच्याकडून चांगला प्रतिसाद देखील दिला जात असून दैनंदिन आहारनियमित घेतला जात आहे. पहिला बाधित रूग्ण हा ग्रामीण भागातील तर दुसरा रूग्ण शहरातील मध्यवर्ती भागातील असल्याने आरोग्य यंत्रणेपुढे संबंधिताच्या संपर्कातील व्यक्तींना शोधण्याचे आव्हान आहे. संशयावरून दाखल करून घेण्यात आलेल्या पाच पैकी चौघांचे अहवाल निगेटिव्हा प्राप्त झाले आहेत. आणखी काही रूग्ण बुधवारी ताब्यात घेण्यात आले असून त्यांचे देखील स्वॅब पाठविण्यात आलेले आहेत.
दरम्यान, दुसरा रूग्ण वास्तव्यास असलेल्या गोविंदनगर परिसरातील संपुर्ण तीन किलोमीटरचा परिसर सील करण्यात आला आहे. स्थानिक नागरिकांना कोणालाही घराबाहेर पडण्यास मनाई करण्यात आलेली आहे. मंगळवारपासून संपुर्ण परिसर हा आरोग्य विभागाच्या निगराणीखाली असून पोलीस बंदोबस्त देखील तैनात करण्यात आलेला आहे. नागरिकांना घराबाहेर पडण्यास मनाई असल्यामुळे बुधवारी कुणालाही इमारतीच्या बाहेर देखील येता आले नाही.