शासकीय रुग्णालयांमध्ये ‘व्हेंटिलेटर’ पुरवा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 4, 2017 10:32 PM2017-09-04T22:32:58+5:302017-09-04T22:39:52+5:30
नाशिक : शासनाच्या आरोेग्य विभागाने नाशिक जिल्हा रुग्णालय व ग्रामीण रुग्णालयांसह महापालिकेच्या दवाखान्यांमध्ये नवजात बालकांच्या उपचारासाठी अत्यावश्यक सेवा म्हणून ‘व्हेंटिलेटर’ पुरविण्याची मागणी छत्रपती शिवाजी मुस्लीम ब्रिगेड संघटनेने निवेदनाद्वारे केली आहे.
उत्तर प्रदेशमधील गोरखपूर शहरात व्हेंटिलेटरअभावी झालेल्या बालकांच्या मृत्यूच्या दुर्दैवी घटनेनंतर राज्य शासनाने धडा घ्यावा, सरकारी दवाखान्यांमध्ये व्हेंटिलेटरची असलेली सुविधा तपासावी, तसेच जेथे व्हेंटिलेटर नसतील तेथे त्वरित उपलब्ध करून द्यावे, असे आरोग्य उपसंचालकांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे. संदर्भ सेवा रुग्णालयामध्येही बहुतांश यंत्रणाही नादुरुस्त असल्याकडे लक्ष वेधण्यात आले.
तसेच खासगी वैद्यकीय व्यवसायाप्रमाणेच शासकीय वैद्यकीय सेवा पुरविण्याची गरज असून गोरगरीब रुग्णांची होणारी पिळवणूक व गैरसोय थांबविण्याची गरज असल्याचे निवेदनात म्हटले आहे. यावेळी अजीज पठाण, योगेश मिसाळ, माधुरी भदाणे, रफीक खान आदी उपस्थित होते.