स्वातंत्र्यवीर सावरकर जयंती साधेपणाने:पुरातत्व विभागाकडून पुतळ्याचे पूजन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 28, 2021 05:40 PM2021-05-28T17:40:16+5:302021-05-28T17:45:31+5:30

नाशिक : भगूर येथील जन्मस्थान स्मारकात स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर तथा तात्याराव सावरकर यांची १३८ वी जयंती अत्यंत साधेपणाने साजरी ...

nashik,greetings,to,the,birthplace,memorial,of,swatantryaveer,savarkar | स्वातंत्र्यवीर सावरकर जयंती साधेपणाने:पुरातत्व विभागाकडून पुतळ्याचे पूजन

स्वातंत्र्यवीर सावरकर जयंती साधेपणाने:पुरातत्व विभागाकडून पुतळ्याचे पूजन

Next


नाशिक: भगूर येथील जन्मस्थान स्मारकात स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर तथा तात्याराव सावरकर यांची १३८ वी जयंती अत्यंत साधेपणाने साजरी करण्यात आली.
कोरोना नियमांचे पालन करीत सकाळी पुरातत्व विभागाचे सोमनाथ बोराडे यांच्या हस्ते सावरकर जन्म खोलीचे पुजन करण्यात आले. यावेळी सावरकरांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करण्यात आला.
पुराततत्व विभागाच्यावतीने शासकीय पुजा करण्यात आली. स्मारक फक्त पुजेसाठी उघण्यात येऊन बंद ठेवण्यात आले. यावेळी वीर सावरकर भगूर स्मारकाचे व्यवस्थापक मनोज कुवर, भुषण कापसे, योगेश बुरके, प्रशांत लोया, मंगेश मरकड, संभाजी देशमुख, खंडु रामगडे, विजय घोडेकर, उपस्थित होते. तसेच सावरकर जयंती उत्सव समितीच्या वतीने शिवाजी महाराज चौकातील वीर सावरकर व शिवाजी महाराज पुतळ्यास खासदार हेमंत गोडसे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी कामगार नेते प्रशांत कापसे, माजी पोलीस अधीक्षक रमेश पवार, प्रताप पवार, माजी नगरसेवक राजाभाऊ सोनवणे, वसंत पाटील,पो.नि. शाम शिंदे,राजेंद्र बागडे, भरत चव्हाण, उपस्थित होते.
दरवर्षी जयंतीच्या दिवशी या ठिकाणी भरगच्च कार्यक्रमांचे आयोजन केल जाते. परंतु सलग दुसऱ्या दिवशी या ठिकाणी कोणताही सार्वजिनक स्वरुपाचा कार्यक्रम घेण्यात आलेला नाही. स्थानिक नागरिकांना स्मारकाच्या बाहेरूनच स्वातंत्र्यवीरांच्या पुतळ्याचे दर्शन घ्यावे लागले.
--इन्फो--
नोकरी, व्यवसाय, उद्योगधंद्यांमुळे भगूरच्या बाहेर असलेले भूमीपूत्र जयंतीच्यादिवशी आवर्जून जन्मभूमी स्मारकाला अभिवादन करण्यासाठी येत असतात. परंतू गेल्या दोन वर्षांपासून कोरोनामुळे सार्वजिनक कार्यक्रम नसल्याने तसेच स्मारकही बंद ठेवावे लागत असल्याने अनेकांना स्मारकात येता आलेले नाही. त्यामुळे अत्यंत साधेपणाने जयंती कार्यक्रम कारावा लागत आहे. यंदा देखील तरुणांना स्मारकाच्या दर्शनासाठी येता आलेले नसल्याची खंत अनेकांनी बोलून दाखविली.

Web Title: nashik,greetings,to,the,birthplace,memorial,of,swatantryaveer,savarkar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.