आरोग्य विदयापीठ प्राधिकरण निवडणुकीसाठी ३२ मतदान केंद्रे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 26, 2017 07:56 PM2017-12-26T19:56:32+5:302017-12-26T20:05:18+5:30

नाशिक : महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाचे विविध प्राधिकरण मंडळाची  निवडणूक दि. २८ रोजी होत  असून, याकरिता राज्यातील विविध ३२ ठिकाणी मतदान केंद्रे निश्चित करण्यात आली आहेत. विद्यापीठातर्फे प्रत्येक मतदान केंद्रावर प्रत्येकी एक मतदान केंद्राध्यक्ष व मतदान अधिकाऱ्यांची नेमणूक करण्यात आली आहे.

nashik,health, university,elction | आरोग्य विदयापीठ प्राधिकरण निवडणुकीसाठी ३२ मतदान केंद्रे

आरोग्य विदयापीठ प्राधिकरण निवडणुकीसाठी ३२ मतदान केंद्रे

Next
ठळक मुद्देदि. २८  रोजी सकाळी १० ते दुपारी ४ वेळेत मतदानमतमोजणी शनिवार, दि. ३० रोजी विद्यापीठ मुख्यालयात

नाशिक : महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाचे विविध प्राधिकरण मंडळाची  निवडणूक दि. २८ रोजी होत  असून, याकरिता राज्यातील विविध ३२ ठिकाणी मतदान केंद्रे निश्चित करण्यात आली आहेत. विद्यापीठातर्फे प्रत्येक मतदान केंद्रावर प्रत्येकी एक मतदान केंद्राध्यक्ष व मतदान अधिकाऱ्यांची नेमणूक करण्यात आली आहे.
विद्यापीठ प्राधिकरण निवडणुकीसाठी नियुक्त करण्यात आलेल्या मतदान केंद्राध्यक्ष व मतदान अधिकारी यांना मतदान प्रक्रियेसंदर्भात विद्यापीठाकडून मार्गदर्शन करण्यात आले आहे. यावेळी मतदानासाठी नियुक्त अधिकारी व  कर्मचाऱ्यांना मतदान साहित्याचे वाटप करण्यात आले. या मतदानासाठी राज्यात मुंबई भायखळा येथील ग्रॅट मेडिकल कॉलेज, जे. जे. हॉस्पिटल कम्पाउंड, मुंबई येथे सेठ जी. एस. मेडिकल कॉलेज, के.ई.एम. हॉस्पिटल कम्पाउंड, सेंट्रल मुंबई येथील टोपीवाला नॅशनल मेडिकल कॉलेज, वरळी येथे आर. ए. पोतदार आयुर्वेद महाविद्यालय, सायन येथे लोकमान्य टिळक मेडिकल कॉलेज, रत्नागिरी जिल्ह्यातील खेड येथे एस.ए.एस.एस. योगीता डेंटल कॉलेज अ‍ॅण्ड हॉस्पिटल, खारघर नवी मुंबई येथे येरला मेडिकल ट्रस्ट आयुर्वेदिक महाविद्यालय, पुणे येथील आर्म फोर्सेस मेडिकल कॉलेज, बी. जे. मेडिकल कॉलेज, टिळक आयुर्वेद महाविद्यालय, आकुर्डी येथील पी.डी.ई.एस. कॉलेज आॅफ आयुर्वेद अ‍ॅण्ड रिसर्च सेंटर, सांगली जिल्ह्यात मिरज येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, सातार येथील एस. सी. मुथा  आयुर्वेद महाविद्यालय, कोल्हापूर येथील राजर्षी छत्रपती शाहू महाराज शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, सोलापूर येथे डॉ. वैशंपायन मेमोरिअल शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, नाशिक येथे आयुर्वेद सेवा संघ आयुर्वेद महाविद्यालय, धुळे येथे भाऊसाहेब हिरे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, जळगाव येथे चामुंडामाता होमिओपॅथिक कॉलेज, अहमदनगर येथे गंगाधर शास्त्री गुणे आयुर्वेद महाविद्यालय, संगमनेर येथे श्रीमती मथुराबाई भाऊसाहेब थोरात दंत महाविद्यालय, औरंगाबाद येथे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, नांदेड येथे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, लातूर येथे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, बीड जिल्ह्यात आंबेजोगाई येथील स्वामी रामानंद तीर्थ मेडिकल कॉलेज, वर्धा येथील महात्मा गांधी मेडिकल कॉलेज, नागपूर येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, इंदिरा गांधी मेडिकल कॉलेज आणि एन.के.पी. साळवे मेडिकल कॉलेज अ‍ॅण्ड रिसर्च सेंटर, अमरावती येथील विदर्भ आयुर्वेद महाविद्यालय, यवतमाळ येथे वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, अकोला येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, गोंदिया येथे शासकीय महाविद्यालय या ठिकाणी मतदान केंद्रे निश्चित करण्यात आली आहेत.
दि. २८  रोजी सकाळी १० ते दुपारी ४ वेळेत मतदान घेण्यात येणार आहे. मतमोजणी शनिवार, दि. ३० रोजी विद्यापीठ मुख्यालयात होणार असून  त्यानंतर निवडणुकीचा निकाल जाहीर केला जाईल.

Web Title: nashik,health, university,elction

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.