बालमृत्यू रोखण्यासाठी जिल्हा रुग्णालयातील इन्क्युबेटरची संख्या वाढविणार : दीपक सावंत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 9, 2017 07:07 PM2017-09-09T19:07:55+5:302017-09-09T19:31:00+5:30

nashik,health,minister,sawant,civil,visit | बालमृत्यू रोखण्यासाठी जिल्हा रुग्णालयातील इन्क्युबेटरची संख्या वाढविणार : दीपक सावंत

बालमृत्यू रोखण्यासाठी जिल्हा रुग्णालयातील इन्क्युबेटरची संख्या वाढविणार : दीपक सावंत

googlenewsNext
ठळक मुद्दे नाशिक जिल्हा रुग्णालयाला अचानक भेट एनआयसीयू युनिटची तपासणीसुमारे चौदा इन्क्युबेटर वाढणारपीडिअ‍ॅट्रिक व्हेंटिलेटर पुरविण्याची ग्वाही

नाशिक : जिल्हा रुग्णालयातील एनआयसीयू युनिटमध्ये उपचार सुरू असलेल्या नवजात अर्भकांच्या वाढत्या मृत्यूची गंभीर दखल घेत राज्याचे आरोग्यमंत्री दीपक सावंत यांनी शनिवारी (दि़९) अचानक जिल्हा रुग्णालयास भेट देत एनआयसीयू युनिटची तपासणी केली़ नवजात अर्भकांची वाढती संख्या लक्षात घेता केंद्र शासनाचे निकष बाजूला सारत सद्यस्थितीत आणखी पाच ते सात व महिनाभरात आणखी पाच ते सात अशा सुमारे चौदा इन्क्युबेटरची संख्या वाढविण्यात येणार असून, पीडिअ‍ॅट्रिक व्हेंटिलेटर पुरविण्याची ग्वाही दीपक सावंत यांनी पत्रकार परिषदेत दिली़


जिल्हा रुग्णालयातील एनआयसीयू (न्यू बेबी स्पेशल केअर युनिट)मध्ये गत पाच महिन्यांत १८७, तर आॅगस्टमध्ये ५५ तर सप्टेंबरमध्ये १५ अर्भकांचा मृत्यू झाला आहे़ या विभागात उपचारासाठी दाखल करण्यात येणाºया नवजात अर्भकांच्या संख्येमुळे विभागातील १८ इन्क्युबेटरमध्ये प्रत्येकी चार अर्भक ठेवली जात असल्याचे वास्तव प्रसिद्धी माध्यमांनी समोर आणले होते़ याबाबत शुक्रवारी (दि़८) मंत्रालयात बैठक झाल्यानंतर शनिवारी डॉ़ सावंत यांनी जिल्हा रुग्णालयास आरोग्य सचिवांसह अचानक भेट देऊन एनआयसीयू युनिटची पाहणी करून परिस्थितीची माहिती घेतली़

यावेळी, डॉ़ सावंत यांनी सांगितले की, जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी येणाºया नवजात अर्भकांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली असून, प्रतिवर्ष ५० हजार इतकी झाली आहे़ धुळे, नंदुरबार, जव्हार, वाडा, मोखाडा या ठिकाणांसह तीनशे किलोमीटरहून बालके या ठिकाणी उपचारासाठी दाखल केले जातात़ जिल्ह्यातील ५६ टक्के तर बाहेरील जिल्ह्यातील ४४ टक्के नवजात बालके उपचारासाठी दाखल होत असून, बाहेरील मुलांमध्ये इन्फेक्शनचे प्रमाण अधिक असते़ त्यात ५०० ग्रॅम व एक किलोच्या आत वजन असलेल्या बालकांची संख्या अधिक असल्याने त्यांना वाचविणे हे एक आव्हान असते़
बालमृत्यूबाबत आपण अधिक संवेदनशील असून, पालघर जिल्ह्याचा बालमृत्यूदर कमी करण्यात यश आले आहे़ याच धर्तीवर नाशिक जिल्हा रुग्णालयासाठी केंद्र शासनाचे निकष बदलून इन्क्युबेटरची संख्या १४ ने वाढविली जाईल तसेच पीडिअ‍ॅट्रिक व्हेंटिलेटर पुरविण्याची ग्वाही आरोग्यमंत्री सावंत यांनी दिली़

वृक्षांचा अडथळा येत्या आठ दिवसांत दूर
नवजात अर्भकांवर उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात स्वंतत्र इमारत बांधली जाणार असून, त्यासाठी २१ कोटी रुपयांचा निधीही शासनाने मंजूर केलेला आहे़ मात्र या इमारतीसाठी असलेला वृक्षांचा अडथळा येत्या आठ दिवसांत दूर करून तोडगा काढला जाणार आहे़ याबाबत मुख्यमंत्री व आरोग्य सचिव महापालिका आयुक्तांशी बोलले असून, हा अडथळा दूर होऊन लवकरच कामास सुरुवात होईल, असे आरोग्यमंत्री सावंत यांनी सांगितले़

Web Title: nashik,health,minister,sawant,civil,visit

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.