उपोषणकर्त्या महिला कर्मचाऱ्यांची तब्येत खालावली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 4, 2018 04:36 PM2018-05-04T16:36:49+5:302018-05-04T16:36:49+5:30

आरोग्य विज्ञान विद्यापीठातील रोजंदारी कर्मचाऱ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सुरू केलेल्या उपोषणाच्या चौथ्या दिवशी तीन महिला कर्मचाºयांची तब्येत खालावल्याने त्यांना जिल्हा रूग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले आहे.

nashik,health,univercity,vc,workars | उपोषणकर्त्या महिला कर्मचाऱ्यांची तब्येत खालावली

उपोषणकर्त्या महिला कर्मचाऱ्यांची तब्येत खालावली

Next
ठळक मुद्देआरोग्य विद्यापीठ : जिल्हा रूग्णालयात दाखलआगामी काळात जनआंदोलन छेडण्याचा इशारा

नाशिक : आरोग्य विज्ञान विद्यापीठातील रोजंदारी कर्मचाऱ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सुरू केलेल्या उपोषणाच्या चौथ्या दिवशी तीन महिला कर्मचाºयांची तब्येत खालावल्याने त्यांना जिल्हा रूग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले आहे. अन्य चौघा कर्मचाºयांना देखील वैद्यकीय पथकाने दाखल करण्याचा सल्ला दिला आहे मात्र त्यांनी उपचारास नकार दिला आहे. दरम्यान, उपोषणकर्त्यांची तब्येत खालावत असतांनाही प्रशासनाकडून उपोषणकर्त्यांशी कुणीही चर्चेला आले नसल्याने आंदोलन चिघळण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
आरोग्य विज्ञान विद्यापीठात गेल्या आठ ते दहा वर्षांपासून रोजंदारी पद्धतीने काम करणाºया सुमारे ३५० कर्मचाºयांनी ‘समान काम आणि समान दाम’ या मागणीसाठी गेल्या पाच महिन्यांपासून आरोग्य विज्ञान विद्यापीठासमोर काम बंद आंदोलन सुरू केले आहे. सनदशीर मार्गाने आंदोलन करूनही आरोग्य विज्ञान विद्यापीठाने या कर्मचाºयांसंदर्भात कोणताही निर्णय घेतलेला नाही. याउलट कामगार उपायुक्त आणि न्यायालायसमोर कर्मचारी हिताचा निर्णय घेण्याचे आश्वासन देऊनही विदयपीठ प्रशासनाने नंतर कोणताही शब्द पाळला नसल्याचा आरोप कंत्राटी कर्मचाऱ्यानी केला आहे.
विद्यापीठ प्रशासन आणि मंत्रालयाकडून या संदर्भात अनेकदा आश्वासने देण्यात आली मात्र एकही आश्वासन शासनाने पाळले नसल्याने अखेर कर्मचाऱ्यानी १ मे  महाराष्ट्र  दिनानासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषणाला सुरूवात केली आहे. उपोषणाच्या चौथ्या दिवशी सुमारे दहा कर्मचाऱ्यांची तब्येत खालवल्याने प्रशासनाने त्यांची वैद्यकीय तपासणी करून त्यांना जिल्हा रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे. प्राजक्ता वनीस, तृप्ती जाधव आणि ज्योती पेखळे असे रूग्णालयात दाखल करण्यात आलेल्या महिला कर्मचाऱ्यांची नावे आहेत. अन्य काही कर्मचाऱ्यानी मात्र उपसारास नकार दिला आहे. यामुळे आंदोलन चिघळण्याची शक्यता आहे. कर्मचाऱ्यांनी पुकारलेल्या आंदोलनाला अनेक संघटनांचा पाठींबा मिळत असल्याने आगामी काळात मोठा जनआंदोलन छेडण्याचा इशारा देखील देण्यात आला आहे.

Web Title: nashik,health,univercity,vc,workars

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.