पती-पत्नीचे भांडण सोडविण्यासाठी गेला अन् युवक जीवाला मुकला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 23, 2018 04:27 PM2018-02-23T16:27:39+5:302018-02-23T16:33:45+5:30
नाशिक : पिण्याचे पाणी देण्याच्या कारणावरून पती-पत्नीचे भांडण सुरू असताना भांडण करू नका असे समजावून सांगण्यासाठी गेलेल्या तीस वर्षीय युवकाचा दोघांनी केलेल्या जबर मारहाणीत मृत्यू झाल्याची घटना गुरुवारी (दि़२२) रात्रीच्या सुमारास आगरटाळळी येथील सम्राटनगरमध्ये घडली़ विजय रमेश सूर्यवंशी (३०, रा़ सम्राटनगर, आगरटाकळी, उपनगर) असे खून केलेल्या युवकाचे नाव आहे़ या प्रकरणी उपनगर पोलीस ठाण्यात दोन संशयितांविरोधात खूनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे़

उपनगर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार पाथर्डी गावातील संशतिय खंडू हरी गांगुर्डे व त्याच्या पत्नीचे रात्री दहा वाजेच्या सुमारास पाणी पिण्यासाठी देण्याच्या कारणावरून भांडण सुरू होते़ त्यावेळी शेजारी राहणाºया विजय सूर्यवंशी हा तिथे गेला व भांडण करू नका असे समजावून सांगू लागला़ त्यास महिलेचा पती खंडू गांगुर्डे याने गालात चापट मारली़ तर शेजारी असलेला संशयित पांडूरंग उर्फ पांड्या जाधव याने विजयच्या गालाजवळ व डोक्यात मागील बाजूने लाकडी दांडा मारून हातगाड्यावर ढकलून दिले़ या मारहाणीमध्ये गंभीर जखमी झालेल्या विजय सूर्यवंशी याचा मृत्यू झाला़
दरम्यान या घटनेची माहिती मिळताच पोलीस उपायुक्त श्रीकृष्ण कोकाटे, सहाय्यक पोलीस आयुक्त मोहन ठाकूर, उपनगर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक महेंद्र चव्हाण यांच्यासह अधिकारी व कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले होते़ या प्रकरणी सूरज बबन सूर्यवंशी यांच्या फिर्यादीवरून संशयित खंडू हरी गांगुर्डे (५०) व पांडूरंग जाधव (२०) विरोधात खूनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे़