विनापरवाना बियाणे विक्रीतून शेतकऱ्यांची फसवणूक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 14, 2018 07:05 PM2018-03-14T19:05:53+5:302018-03-14T19:06:44+5:30
नाशिक : बियाणे विक्रीचा परवाना असल्याचे भासवून बेकायदेशीरपणे शेतक-यांना बियाणांची विक्री करून शेतक-यांसह शासनाची फसवणूक करणा-या सामनगाव रोडवरील प्रगत कृषी सेवा केंद्राच्या तिघांविरोधात नाशिकरोड पोलीस ठाण्यात जीवनावश्यक कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे़

पंचवटीतील गृहनिर्माण सोसायटीतील रहिवासी अण्णासाहेब नामदेव साठे यांनी पोलिसांत दिलेल्या फिर्यादीनुसार सिन्नरफाटा सामनगावरोड परिसरातील औटे मळ्यात प्रगत कृषी सेवा केंद्र आहे़ या कृषी सेवा केंद्राचे संचालक संशयित जितेंद्र वेलजीभाई कटारिया, हर्ष अशोक सोनजे आणि प्रताप विठ्ठल जाधव यांनी बियाणे विक्रीचा कायदेशीर परवाना असल्याचे भासवून १५ नोव्हेंबर २०१७ रोजी विनापरवाना बियाणांची विक्री करून केवळ नाशिक जिल्ह्यातीलच नव्हे तर राज्यातील शेतक-यांची फसवूणक केली़
प्रगत कृषी सेवा केंद्रातील संचालकांनी केवळ शेतक-यांचीच नव्हे तर शासनाचीही फसवणूक केल्याचे साठे यांनी आपल्या फिर्यादीत म्हटले आहे़ या प्रकरणी नाशिकरोड पोलिसांनी कटारिया, सोनजे व जाधव या तिघांविरोधात फसवणूक, जीवनावश्यक वस्तू अधिनियम, बियाणे कायदा व बियाणे नियंत्रण आदेश या कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे़