पांढुर्लीत पल्स पोलिओ मोहिमेचे उद्घाटन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 10, 2019 06:06 PM2019-03-10T18:06:19+5:302019-03-10T18:08:09+5:30
नाशिक : जागतिक आरोग्य संघटनेच्यामाध्यमातून सुरू करण्यात आलेल्या पोलिओ निर्मुलन मोहिमेंतर्गत पांढुर्ली येथे प्रातिनिधीक स्वरुपात जिल्ह्यातील पल्स पोलिओ मोहिमेचे ...
नाशिक: जागतिक आरोग्य संघटनेच्यामाध्यमातून सुरू करण्यात आलेल्या पोलिओ निर्मुलन मोहिमेंतर्गत पांढुर्ली येथे प्रातिनिधीक स्वरुपात जिल्ह्यातील पल्स पोलिओ मोहिमेचे उद्घाटन जिल्हा परिषद अध्यक्ष शीतल सांगळे यांच्या हस्ते करण्यात आले.
याप्रसंगी पांढुर्ली चे सरपंच वैशाली भालेराव, माजी सरपंच शांताराम ढोकणे, उपसरपंच पंढरीनाथ ढोकणे, कैलास वाजे, तुषार मोजाड ग्रामपंचायत सदस्य, सावतानगर सरपंच मंडलिक, घोरवड चे सरपंच रमेश हगवणे तसेच विष्णू वाजे माजी सरपंच ग्रामविकास अधिकारी सातपुते, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. मोहन बच्छाव व प्राथमिक आरोग्य केंद्र पांढुर्ली येथील डॉ. राहुल पाटील इत्यादी मान्यवर उपस्थित होते.
अध्यक्षीय भाषणात जिल्हा परिषद अध्यक्ष शीतल सांगळे यांनी सांगितले की, आरोग्य विभाग विविध आरोग्य विषयक कार्यक्र म राबवीत असतो. राष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरण मोहिम महत्वाची मोहीम असून आपल्या घरातील आणि परिसरातील शून्य ते पाच वर्षे वयोगटातील सर्व बालकांना पोलिओ बूथवर नेऊन लस पाजून घेण्यात यावी असे आवाहन त्यांनी यावेळी केले. आरोग्य चांगले राखण्यासाठी विविध योजना या शेवटच्या घटकापर्यंत पोहोचणे आवश्यक आहे. यासाठी आरोग्य विभाग सतत प्रयत्नशील असतोच याबाबत त्यांनी आरोग्य विभागाचे कौतुक केले. कोणतेही बालक लसीकरणापासून वंचित राहणार नाही यासाठी नागरिकांनाही त्यांनी आवाहन केले.
काही कारणास्तव लसीकरणापासून वंचित राहिलेल्या बालकांनाही डोस दिला जाणार आहे. वैद्यकीय अधिकारी पाटील यांनी सर्वांचे आभार मानले कार्यक्र म यशस्वीतेसाठी आरोग्यसेविका पांडागळे , साधना वाजे. हायलिंगे यांनी विशेष प्रयत्न केले.