संततधार पावसाने धरणांच्या पातळीत वाढ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 8, 2019 06:55 PM2019-07-08T18:55:21+5:302019-07-08T18:56:17+5:30

नाशिक : रविवारी दिवसभर झालेल्या पावसाने सायंकाळी विश्रांती घेतल्यानंतर सोमवारी दुपारपासून नाशिकमध्ये पुन्हा संततधार पावसाला सुरुवात झाली. गेल्या चोवीस ...

nashik,increase,in,the,level,of,the,dam,continuous,rainfall | संततधार पावसाने धरणांच्या पातळीत वाढ

संततधार पावसाने धरणांच्या पातळीत वाढ

Next

नाशिक : रविवारी दिवसभर झालेल्या पावसाने सायंकाळी विश्रांती घेतल्यानंतर सोमवारी दुपारपासून नाशिकमध्ये पुन्हा संततधार पावसाला सुरुवात झाली. गेल्या चोवीस तासांत जिल्ह्यात ७२४ मि.मी. पावसाची नोंद झाली असून, या पावसामुळे जिल्ह्यातील धरणसाठ्यामध्ये वाढ झाली आहे. शहर परिसरात पावसाचा जोर कमी असला तरी धरण क्षेत्रात सुरू असलेल्या पावसामुळे धरणांमधील पाण्याची पातळी वाढली आहे.
गंगापूर धरणातील पाणीसाठ्यात मोठी वाढ झाली असून, अवघ्या ९ टक्क्यांवर असलेल्या धरणातील पाणी आता ३३.८५ टक्के इतके झाले आहे. त्यामुळे नाशिकमध्ये सुरू असलेल्या पाणीकपातीचा फेरविचार होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. याबरोबरच दारणा धरण ३८.४१, नांदूरमधमेश्वर ५४.५७, गौतमी-गोदावरी २१.२९, भावली ३९.१२, मुकणे १२ तर कडवा ७.८७ टक्के भरले आहे. दरम्यान, जिल्ह्यात पावसाचा जोर अजूनही कायम असून, इगतपुरी आणि त्र्यंबकेश्वर तालुक्यांमध्येही पावसाचा जोर कायम आहे. गेल्या आठ दिवसांत इगतपुरीत ९६६ तर त्र्यंबकेश्वरमध्ये ४७४ मि.मी. इतक्या पावसाची नोंद झाली आहे. सोमवारी (दि. ८) सकाळपासून या ठिकाणी पाऊस सुरू झाला आहे.
दरम्यान, दोन दिवसांच्या पावसामुळे गोदावरी नदीला पूरसदृश परिस्थिती निर्माण झाली असली तरी मध्यरात्री पूर काहीसा ओसरला आहे. मात्र पुढील चार तासांत पावसाची शक्यता लक्षात घेऊन जिल्हा प्रशासनाने नदीकाठावरील रहिवाशांना सतर्कतेचा इशारा दिला असून, आपत्कालीन यंत्रणा सज्ज ठेवली आहे. गेल्या दोन दिवसांपासून त्र्यंबकेश्वरमध्ये जोरदार पाऊस सुरू असल्याने यात्रेकरू, भाविकांना अडकून पडावे लागले. तर इगतपुरीमध्ये गेल्या चोवीस तासांत सर्वाधिक पावसाची नोंद झाली.

Web Title: nashik,increase,in,the,level,of,the,dam,continuous,rainfall

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.