इंदिरानगरला महिलेचे लाखाचे मंगळसूत्र खेचले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 2, 2018 03:26 PM2018-03-02T15:26:16+5:302018-03-02T15:26:16+5:30

नाशिक : होळीची पूजा करून देवदर्शनासाठी जाणाºया महिलेच्या गळ्यातील सुमारे लाखाचे सोन्याचे मंगळसूत्र दुचाकीवरील संशयितांनी खेचून नेल्याची घटना गुरुवारी (दि़१) रात्रीच्या सुमारास चेतनानगरमध्ये घडली़ या प्रकरणी इंदिरानगर पोलीस ठाण्यात जबरी चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे़

nashik,Indiranagar,women, lifts,gold,mangalasutra | इंदिरानगरला महिलेचे लाखाचे मंगळसूत्र खेचले

इंदिरानगरला महिलेचे लाखाचे मंगळसूत्र खेचले

googlenewsNext
ठळक मुद्देचेतनानगर : दुचाकीवरील संशयितमंदिरात दर्शनासाठी जात असतानाची घटना

नाशिक : होळीची पूजा करून देवदर्शनासाठी जाणाºया महिलेच्या गळ्यातील सुमारे लाखाचे सोन्याचे मंगळसूत्र दुचाकीवरील संशयितांनी खेचून नेल्याची घटना गुरुवारी (दि़१) रात्रीच्या सुमारास चेतनानगरमध्ये घडली़ या प्रकरणी इंदिरानगर पोलीस ठाण्यात जबरी चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे़

इंदिरानगर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार मनीषा मिसाळ (४०, राफ़्लॅट नंबर ४, इच्छामणी हाइट््स, कृष्णाईनगर, चेतनानगर) व त्यांचे पती कैलास यांनी सायंकाळी इमारतीमधील होळीची पूजा केली़ त्यानंतर रात्री ८.३० वाजेच्या सुमारास मिसाळ दाम्पत्यशेजारील तनुजा भिरुड यांच्यासोबत परिसरातील शंकराच्या मंदिरात दर्शनासाठी निघाले़

कैलास मिसाळ हे दुचाकीवर पुढे मंदिरात गेले, तर मनीषा व तनुजा या दोघी सोनवणे मळा, एकवीरा बंगला लोट््स हाइट््स येथून पायी जात होत्या़ यावेळी समोरून सफेद रंगाच्या मोपेडवर आलेल्या दोन संशयितांपैकी पाठीमागे बसलेल्याने मिसाळ यांच्या गळ्यातील एक लाख सहा हजार रुपये किमतीचे सोन्याचे पाच तोळे वजनाचे मंगळसूत्र खेचून नेले़

या घटनेनंतर मनीषा मिसाळ यांनी आरडाओरड केली मात्र तोपर्यंत संशयित फरार झाले होे़ याप्रकरणी मिसाळ यांच्या फिर्यादीवरून जबरी लुटीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे़

सोनसाखळी चोरीचा हॉटस्पॉट
चेतनानगर येथील लोट््स हाइट्स परिसरातील रस्त्यावर अनेकदा महिलांच्या गळ्यातील मंगळसूत्र, सोन्याचे चेन खेचून नेल्याच्या घटना घडलेल्या आहेत़ त्यामुळे सोनसाखळी चोरीचा हा हॉटस्पॉट बनला असून, गुरुवारीच या घटना घडत असल्याने या परिसरात पोलीस बंदोबस्त तैनात करण्याची मागणी नागरिकांकडून केली जाते आहे़

Web Title: nashik,Indiranagar,women, lifts,gold,mangalasutra

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.