निवडणूक पोलिस निरीक्षकांकडून ‘वॉर रूम’ची पाहाणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 21, 2019 13:53 IST2019-10-21T13:52:02+5:302019-10-21T13:53:11+5:30
नाशिक , विधानसभा सार्वत्रिक निवडणूक २०१९ अनुषंगान प्रसिध्दी माध्यमे व सोशल मिडीयाद्वारे प्रसारित होणाऱ्या मतदान प्रक्रि येबाबत बातमी व ...

निवडणूक पोलिस निरीक्षकांकडून ‘वॉर रूम’ची पाहाणी
नाशिक, विधानसभा सार्वत्रिक निवडणूक २०१९ अनुषंगान प्रसिध्दी माध्यमे व सोशल मिडीयाद्वारे प्रसारित होणाऱ्या मतदान प्रक्रि येबाबत बातमी व तक्र ारींवर देखरेख ठेवण्यासाठी तयार करण्यात ‘वॉर’ रु मचा आढावा निवडणूक पोलिस निरीक्षक योगेश चौधरी विजय शर्मा यांनी सोमवारी घेतला.
यावेळी जिल्हाधिकारी सूरज मांढरे, अपर जिल्हाधिकारी निलेश सागर, उपजिल्हानिवडणुक अधिकारी कुंदन सोनवणे, मनपाचे उपायुक्त (कर) प्रदीप चौधरी, जिल्हा नियोजन अधिकारी हेमंत अिहरे, जिल्हा विधी अधिकारी हेमंत नागरे, बीएसएनएलचे श्री.बर्वे उपस्थित होते.
मांढरे यांनी, विधानसभा निवडणुकीत मतदान केंद्रावरील हालचालींवर जिल्हा प्रशासनाचे लक्ष असून ‘वॉर’ रूमच्या माध्यमातून वेब कास्टींगद्वारे बारीकसारीक घडोमोडींवर लक्ष ठेवण्यासह अनुचित प्रकार टाळण्यासही मदत होणार आहे. जिल्ह्यातील १५ विधानसभा मतदारसंघामधील ४ हजार ५७९ मतदान केंद्रांपैकी सुमारे ४५० केंद्रे वेबकास्टिंगद्वारे जोडण्यात आली असल्याची माहिती त्यांनी यावेळी पोलिस निरीक्षकांना दिली. वॉररॉममध्ये टीव्ही स्क्र ीन लावण्यात आलेल्या विविध प्रक्षेपणही पाहिले जाणार आहे. या माध्यमातून मिळणाºया माहितीमधील तथ्य तपासले जाणार आहे. प्रसारीत झालेल्या माहिती किंवा बातमीमध्ये काही विसंगती आढळली तर अचूक माहिती देण्याचे काम प्रशासनाकडून केले जाणार असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.