दुसऱ्या टप्प्यात ६८ टक्के अनुदान वाटप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 3, 2020 08:43 PM2020-01-03T20:43:03+5:302020-01-03T20:44:15+5:30
नाशिक : परतीच्या पावसामुळे बाधित झालेल्या शेतकऱ्यांना भरपाई देण्यासाठी जिल्हा प्रशासनाला दुसºया टप्प्यात प्राप्त ३९६ कोटी ६२ लाखांचा निधी ...
नाशिक: परतीच्या पावसामुळे बाधित झालेल्या शेतकऱ्यांना भरपाई देण्यासाठी जिल्हा प्रशासनाला दुसºया टप्प्यात प्राप्त ३९६ कोटी ६२ लाखांचा निधी वितरणाचा कामाला गती आली असून एकुण ६८ टक्के रकमेची भरपाई वितरीत करण्यात आल्याची माहिती जिल्हा प्रशासनाकडून देण्यात आली.
परतीच्या पावसामुळे नुकसान झालेल्या शेतकºयांसाठी नुकसानभरपाईचा दुसरा हप्ता मागील महिन्यात जिल्हा प्रशासनाला प्राप्त झाल्यानंतर सुमारे साडेपाच लाख शेतकºयांना भरपाई देण्यास प्रारंभ झाला आहे. पहिल्या टप्प्यातील १८१ कोटींच्या भरपाईची रक्कम तालुकानिहाय नुकसानग्रस्त शेतकºयांच्या खात्यात जमा करण्यात आल्यानंतर दुसºया टप्प्यातील भरपाई वाटपासही गती आलेली आहे.
पहिल्याटप्प्यातील अनुदान वाटप करतांना आलेल्या अडचणींवर मात करून दुसºया टप्यातील अनुदान वाटप सुलभ होईल असे बोलले जात असतांनाच दुसºया टप्यातील अनुदान प्राप्त झाल्यानंतर एकाच बॅँकेच्या माध्यमातून अन्य बॅँकांमध्ये भरपार्ईचे धनादेश वर्ग करण्यासंदर्भात निर्णयास काहीसा विलंब झाला. मदतीची रक्कम तहसील कार्यालयांमार्फत न देता एकाच बॅँकेच्या माध्यमातून शेतकºयांच्या खात्यात रक्कम वर्ग करण्याचा निर्णय घेण्यात आल्यामुळे सबंधिंत बॅँकेला लाभार्थी शेतरकºयांच्या नावांची यादी सादर करणे, याद्या इंग्रजीत करणे, तालुकानिहाय याद्या तयार करणे या कामात यंत्रणा व्यस्त होती. दिलेल्या याद्यांमध्ये इंग्रजी स्पेलींगच्या चुका असल्यामुळे त्या दुरूस्तीसाठी देखील दोन चार दिवसांचा वेळ वाया गेला होता.