जम्परोप स्पर्धेत २१० खेळाडूंचा विक्र मी सहभाग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 6, 2018 04:21 PM2018-09-06T16:21:57+5:302018-09-06T16:23:30+5:30

nashik,involved,participation,Jumpe,competition | जम्परोप स्पर्धेत २१० खेळाडूंचा विक्र मी सहभाग

जम्परोप स्पर्धेत २१० खेळाडूंचा विक्र मी सहभाग

Next
ठळक मुद्देसब ज्युनियर आणि ज्युनियर गटाच्या नाशिक जिल्हा जम्परोप स्पर्धा

जिल्हा स्पर्धा : विविध वयोगटात मुले-मुली चमकले
नाशिक: नाशिक जिल्हा जम्परोप असोसिएशनच्या वतीने कालिका मंदिरच्या हॉलमध्ये सब ज्युनियर आणि ज्युनियर गटाच्या नाशिक जिल्हा जम्परोप स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.
      या स्पर्धेत सेंट फ्रान्सिस.स्कुल राणेनगर, एम. एस. कोठारी शाळा, बाल विद्या मंदिर, रंगुबाई जुन्नरे शाळा, रायन इंटरनॅशनल स्कुल, राधिका इंग्लिश स्कुल येवला, आत्मा मलिक स्कुल, येवला, न्यू इंग्लिश स्कुल, रु ई, सेंट फ्रान्सिस.स्कुल, तिडके कॉलनी , भोसला मिलिटरी स्कुलच्या सुमारे २१० खेळाडूंनी सहभाग घेतला. यामध्ये शहरातील शाळांबरोबर नाशिक तालुक्यातूनही खेळाडू मोठया प्रमाणात सहभागी झाले होते.
      या स्पर्धेत ३० सेकंड स्पीड, ३ मिनिट इंडूरन्स, डबल अंडर, फ्री स्टईल अशा प्रकारांचा समावेश होता. या स्पर्धेमध्ये विजयी झालेल्या खेळाडूंना कालिका मंदिर ट्रस्टचे अध्यक्ष अण्णा पाटील यांच्या हस्ते पारितोषिके देण्यात आली. या प्रसंगी क्र ीडा संघटक नितीन हिंगमिरे, मधुकर देशमुख, कामगार सेनेचे उपाध्यक्ष अंकुश पवार, जम्परोप असोसिएशनचे उपाध्यक्ष दीपक निकम, सचिव विक्र म दुधारे, चिन्मय देशपांडे आदी उपस्थित होते.
या स्पर्धेसाठी पंच म्हणून तन्मय किर्णक, शंतनू पाटील, संकेत परदेशी, आयुष मानकर, सौरभ दशपुते, वैभव शिंदे, स्वामींनी शेटे आदिंनी काम बघीतले.
स्पर्धेचा निकाल:
१६वर्षे मुले :- ३० सेकंड स्पीड : आर्यन काळे, आयुष कुमार , श्रेयश नाईकवाडी. डबल अंडर : प्रथम रोहन देशमुख, द्वितीय जितेश शेकटकर , तृतीय क्रमांक ओम सोमवंशी यांनी मिळविला.
थ्री मिनिट इंडूरन्स : प्रथम आर्यन काळे , द्वितीय आयुष कुमार, तृतीय श्रेयश नाईकवाडी .फ्री स्टाईल : प्रथम ओम कुंभारे, द्वितीय इरफान शेख, तृतीय जिगेश शाह. १६ वर्षे मुली :- ३० सेकंड स्पीड : प्रथम शिवानी भोय, द्वितीय गौरी विधाते, तृतीय ज्ञानेश्वरी घोलप. डबल अंडर : प्रथम वसुंधरा पुरी, द्वितीय पूजा गायकवाड, तृतीय आयेशा पठाण . यांनी क्रमांक मिळविला
थ्री मिनिट इंडूरन्स : प्रथम प्रगती जाधव, द्वितीय कोमल गांगुर्डे, तृतीय भक्ती गायकवाड. फ्री स्टाईल : प्रथम तेजल चौधरी, द्वितीय मानसी काटकर , तृतीय कुंजना नेमाडे यांनी विजय मिळविला.

१८ वर्षे मुले :- ३० सेकंड स्पीड :१) काव्य पटेल ,२) सुयोग खंडांगळे ,३) मोहमद अत्तार , डबल अंडर : १) सोहं गुरु ळ, २) अथर्व सुपे, ३) सर्वद किर्डले
थ्री मिनिट इंडूरन्स : प्रथम श्रेय्यस वाल्हे, द्वितीय मिथिलेश निकम, तृतीय अभिषेक भावसार. फ्री स्टाईल : १) अथर्व दुबे २) वैभव पाटील ३) धम्मदीप बनसोडे
१८ वर्षे मुली :- 30 सेकंड स्पीड : १) सिद्धी वाणी २) रेवती पगारे ३) माही पटेल. डबल अंडर : प्रथम तन्मयी यादव, द्वितीय युगंधरा पुरी, तृतीय अक्षा खान
थ्री मिनिट इंडूरन्स : १) साक्षी सोनजे २) सारा खंदारे ३) शुभी सिंग
फ्री स्टाईल : प्रथम मिहिका पाटील ,द्वितीय श्रावणी पाटील , तृतीय स्नेहा भालेराव.

 

Web Title: nashik,involved,participation,Jumpe,competition

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.