नाशिककरांची पुन्हा ‘स्मार्ट’ कोंडी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 23, 2019 12:29 AM2019-09-23T00:29:09+5:302019-09-23T00:29:35+5:30
अवघ्या एक किलोमीटरच्या स्मार्टरोडच्या बांधकाम पूर्ण करण्याची वाढवून दिलेली मुदत संपूर्णही स्मार्टरोडच्या बांधकामचे कवित्व सुरूच असून, गणेशोत्सवानंतर अंशत: सुरू करण्यात आलेला स्मार्टरोड सीबीएस चौकात व मेहेर सिग्नल येथे रविवारी (दि.२२) पुन्हा अचानक बंद केल्याने या मार्गावरून जाणाऱ्या वाहनचालकांना माघारी फिरावे लागले त्यांनी प्रचंड संताप व्यक्त केला.
नाशिक : अवघ्या एक किलोमीटरच्या स्मार्टरोडच्या बांधकाम पूर्ण करण्याची वाढवून दिलेली मुदत संपूर्णही स्मार्टरोडच्या बांधकामचे कवित्व सुरूच असून, गणेशोत्सवानंतर अंशत: सुरू करण्यात आलेला स्मार्टरोड सीबीएस चौकात व मेहेर सिग्नल येथे रविवारी (दि.२२) पुन्हा अचानक बंद केल्याने या मार्गावरून जाणाऱ्या वाहनचालकांना माघारी फिरावे लागले त्यांनी प्रचंड संताप व्यक्त केला. दोन्ही चौकांमध्ये स्मार्टरोडच्या कामासाठी रस्ता पुन्हा एकदा
खोदण्यात येत असून, त्यामुळे या भागातील नागरिकांना वाहतूक कोंडीचा सामना करावा लागत आहे.
गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर विसर्जन मिरवणुकीत अडसर निर्माण होऊ नये यासाठी मेहेर ते अशोकस्तंभ दरम्यानच मार्ग खुला करण्यात आला होता. त्यानंतर त्र्यंबक नाका ते अशोकस्तंभ हा संपूर्ण रस्ता वाहतुकीसाठी खुला करण्यात आला होता. मात्र रविवारी (दि.२२) अचानक हा सस्ता सीबीएस चौकात बंद क रून पुन्हा खोदण्यात आला. त्याचप्रमाणे मेहेर सिग्नल येथेही रस्ता खोदण्यात आला आहे. त्यामुळे शरणपूररोडने शिवाजीरोडच्या दिशेने जाणारी वाहने अडविण्यात आली असून, अशोकस्तंभाकडून त्र्यंबकनाक्याकडे जाणारा मार्ग, महात्मा गांधीरोडकडून सीबीएसकडे येणारा मार्ग बंद करण्यात आला आहे.
त्र्यंबकनाका ते अशोक स्तंभदरम्यानचा रस्ता सुरू असला तरी या मार्गावर समोरून येणाºया वाहनांमुळे अडसर निर्माण होऊन वाहतुकीची कोंडी होत आहे. स्मार्टरोडचे काम सुरू करण्यापूर्वी वाहतुकीचे कोणतेही नियोजन करण्यात आले नसल्याने या मार्गावरून जाणाºया वाहनधारकांना चौकात पोहोचल्यानंतर माघारी फिरावे लागल्याने त्यांनी संताप व्यक्त केला. आता दोन्ही बाजंूचे रस्ते पूर्ण झाले असले तरी सीबीएस चौक व मेहेर चौकातील रस्ता पुन्हा एका खोदल्याने बंद केलेला स्मार्टरोड कधी सुरू होणार, असा सवाल नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे.
पायी चालणाऱ्यांनाही अडसर
स्मार्टरोडचे काम करण्यासाठी ठेकेदाराने रस्ते बंद क रण्यासाठी दोरखंडांचा वापर केला आहे.या मार्गाने पायी चालणाºया नागरिकांना अडचणी येत आहे.
डोक्यावर ओझे घेऊन जाणाºया नागरिकांना ओझे उतरवत ते हातात घेऊन चौक पार करावा लागत आहे. त्यामुळे मोठी कसरत करावी लागते.
पदपथावरून काढला मार्ग
४सीबीएस चौक व मेहेर सिग्नल परिसरात रस्ता खोदल्याने अनेक दुचाकीस्वारांनी स्मार्टरोडलगतच्या पदपथावरून मार्ग काढून रस्ता पार करण्याचा प्रयत्न केला. मेहेर सिग्नलमार्गे अशोकस्तभांकडे जाणाºया वाहनांना मार्ग खुला आहे. त्याचप्रमाणे त्र्यंबकनाका
ते अशोकस्तंभ मार्ग खुला असल्याने महात्मा गांधी मार्गावरून येणारी वाहने याच मार्गाचा वापर
करून सीबीएसकडे येण्याचा प्रयत्न करतात.
त्यामुळे या भागात वाहतूक कोंडी निर्माण होत
आहे, तर अगदी चौकात येऊन पोहोचलेली दुचाकी वाहनचालकांनी या भागातील पदपथांचा वापर करून बाहेर पडण्याचा प्रयत्न केला.