नाशिककरांना घरपोच भाजीपाला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 16, 2020 09:14 PM2020-04-16T21:14:23+5:302020-04-17T00:26:47+5:30

नाशिक : कोरोना व्हायरसच्या संकटकाळात शेतकऱ्यांनी एकत्र येत सुरू केलेली कृषिमाल प्रक्रिया व विपणन उद्योग आणि विविध शेतकरी गट यांनी त्यांच्या शेतातून सुरक्षित आणि निरोगी फळे आणि भाजीपाला आॅनलाइन मागणी केल्यास जवळच्या पिकअप पॉइंट्सवर उपलब्ध करून देत आहेत.

 Nashikites got homemade vegetables | नाशिककरांना घरपोच भाजीपाला

नाशिककरांना घरपोच भाजीपाला

googlenewsNext

नाशिक : कोरोना व्हायरसच्या संकटकाळात शेतकऱ्यांनी एकत्र येत सुरू केलेली कृषिमाल प्रक्रिया व विपणन उद्योग आणि विविध शेतकरी गट यांनी त्यांच्या शेतातून सुरक्षित आणि निरोगी फळे आणि भाजीपाला आॅनलाइन मागणी केल्यास जवळच्या पिकअप पॉइंट्सवर उपलब्ध करून देत आहेत. या सेवेअंतर्गत आतापर्यंत चार दिवसांत शहरातील विविध भागातील नागरिकांना भाजीपाला व फळे घरपोच देण्यात आली आहेत.  घरपोच सेवेअंतर्गत नागरिकांनी फळे, भाजीपाला मिळविण्यासाठी संबंधित गट अथवा उद्योगाकडे आॅनलाइन मागणी नोंदविणे आवश्यक आहे. त्यानंतर कंपनीकडून एका आठवड्याचे साप्ताहिक बास्केट नागरिकांना घरपोच देण्यात येते. या सेवांतर्गत २९ मार्चपासून १ एप्रिलपर्यंत विविध नागरिकांना त्यांच्या मागणीनुसार ७१४ बास्केट घरपोच देण्यात आले होते. त्यात हळूहळू यात वाढ होत असल्याची माहिती जिल्हा प्रशासनाकडून देण्यात आली आहे.

Web Title:  Nashikites got homemade vegetables

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Nashikनाशिक