नाशिककरांना जाणवू लागला उन्हाचा चटका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 14, 2019 10:23 PM2019-10-14T22:23:06+5:302019-10-15T00:53:20+5:30

पावसाने काहीशी विश्रांती घेतली आहे. अधूनमधून उपनगरांमध्ये सरींचा अल्पवेळ तसा जोरदार वर्षाव होत असला तरी वातावरणातील उष्मा वाढण्यास सुरुवात झाली आहे. सायंकाळनंतर रात्री उशिरा सरींचे आगमन काही उपनगरीय परिसरात होते. ऊन, पाऊ स अन् सायंकाळी वातावरणात निर्माण होणारा गारवा या बदलत्या हवामानामुळे आरोग्यावर परिणाम होऊ लागला आहे.

Nashikites started to feel the light of day | नाशिककरांना जाणवू लागला उन्हाचा चटका

नाशिककरांना जाणवू लागला उन्हाचा चटका

Next
ठळक मुद्देकमाल तापमानात वाढ : हवामान बदलाचा आरोग्यावर परिणाम

नाशिक :पावसाने काहीशी विश्रांती घेतली आहे. अधूनमधून उपनगरांमध्ये सरींचा अल्पवेळ तसा जोरदार वर्षाव होत असला तरी वातावरणातील उष्मा वाढण्यास सुरुवात झाली आहे. सायंकाळनंतर रात्री उशिरा सरींचे आगमन काही उपनगरीय परिसरात होते. ऊन, पाऊ स अन् सायंकाळी वातावरणात निर्माण होणारा गारवा या बदलत्या हवामानामुळेआरोग्यावर परिणाम होऊ लागला आहे.
पावसाने उघडीप दिल्यानंतर ‘आॅक्टोबर हिट’चा सामना नागरिकांना करावा लागू शकतो. त्या दिशेने शहराच्या हवामानाची वाटचाल सुरू झाली आहे. दिवसा प्रखर ऊन पडत असून, सायंकाळी पुन्हा थंड वारे वाहू लागतात. त्यामुळे नाशिककरांना सध्या काहीसा विचित्र असा अनुभव हवामानाच्या बाबतीत येताना दिसत आहे. उन्हाची तीव्रता हळूहळू वाढू लागली आहे. कमाल तापमानाचा पारा सोमवारी (दि.१४) ३१.७ अंशांपर्यंत पोहोचल्याची नोंद हवामान निरीक्षण केंद्राकडून करण्यात आली. तसेच किमान तापमान २२.३ अंश इतके नोंदविले गेले. यामुळे नाशिककरांना रविवारी रात्रीदेखील उकाडा काही प्रमाणात जाणवला. हवेतील आर्द्रतेचे प्रमाण सकाळी व सायंकाळी जास्त राहत असल्याने वातावरणात दमटपणाही जाणवतो.
विषाणूजन्य आजाराचा फैलाव वाढला
अचानकपणे शहरातील हवामान बदलू लागल्याने पुन्हा विषाणूजन्य आजारांचा फैलावदेखील होत आहे. सर्दी, खोकला, ताप, अंगदुुखीच्या रुग्णांमध्ये वाढ होताना दिसत आहे. पावसाळा संपून हिवाळा ऋ तूला सुरुवात होणार आहे. तत्पूर्वी विचित्र हवामान तयार झाल्याने विषाणूजन्य आजारांचा जंतूसंसर्ग नागरिकांना होऊ लागला आहे.

Web Title: Nashikites started to feel the light of day

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.