दलित वस्ती सुधार योजनेतील पाणीपुरवठयाची कामे प्राधान्यक्रमावर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 1, 2018 06:10 PM2018-11-01T18:10:06+5:302018-11-01T18:11:21+5:30
. समाजकल्याण विभागामार्फत वृद्ध कलावंत मानधन योजना राबविली जाते. या योजनेचा आढावा घेताांना प्रलंबित मानधन आणि मानधाचे प्रस्ताव तत्काळ निकाली काढण्याचे आदेश दिले. आंतरजातीय विवाह योजना व अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकांसाठी वस्तीचा विकास करणे, तांडावस्ती अपंग बीज भांडवल, अपंग शिष्यवृत्ती, शालेय शिष्यवृत्ती योजनांचा योळी आढावा घेण्यात आला.
नाशिक: जिल्हा परिषदेच्या समाजकल्याण विभागामार्फत राबविल्या जाणाºया विविध योजनांपैकी दलितवस्ती सुधार योजनांवर अधिक लक्ष केंद्रीत करून या योजनांमधील कामांची गुणवत्ता राखण्याबरोबरच दुष्काळी परिस्थितीचा विचार करता या ठिकाणी प्राधान्याने पाणीपुरवठा योजनांची कामे पुर्ण करण्यात यावीत अशा सुचना सभापती सुनीता चारोसकर यांनी दिल्या.
जिल्हा परिषदेच्या समाजकल्याण समितीची सभा सभापती चारोस्कर यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली. यावेळी त्यांनी समाजकल्याण विभागाकडून राबविण्यात येणाºया विविध योजनांची माहिती घेतली. अपुर्ण कामांचा तपशील आणि कामांना होणाºया विलंबाबतही त्यांनी आधिकाºयांना माहिती सादर करण्याचे आदेश दिले. समाजकल्याण विभागामार्फत वृद्ध कलावंत मानधन योजना राबविली जाते. या योजनेचा आढावा घेताांना प्रलंबित मानधन आणि मानधाचे प्रस्ताव तत्काळ निकाली काढण्याचे आदेश दिले. आंतरजातीय विवाह योजना व अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकांसाठी वस्तीचा विकास करणे, तांडावस्ती अपंग बीज भांडवल, अपंग शिष्यवृत्ती, शालेय शिष्यवृत्ती योजनांचा योळी आढावा घेण्यात आला.
दलितवस्ती सुधार योजनेंतर्गत एकुण ३६.११ कोटींचे ९१६ प्रस्ताव प्राप्त झालेले असून प्रस्तावांची छाननी झाल्यानंतर स्दर परिपुर्ण असलेल्या प्रस्तावांना प्रशासकीय मान्यता देण्यात येणार आहे. सदर बैठकीमध्ये नाशिक जिल्ह्यात दुष्काळाचे सावट असल्याने दलित वस्ती सुधार योजनेत दुष्काळी परिस्थितीचा विचार करता पाणीपुरवठ्याच्या कामांना प्राधान्य देण्यात यावे असा निर्णय घेण्यात आला.
दलितवस्ती सुधार योजनेंतंगर्त मंजूर असलेल्या कामांची गुणवत्ता व कामांची तपासणी होत नसल्यामुळे अनेक कामांच्या गुणवत्तेचा प्रश्न निर्माण झालेला आहे. त्यामुळे केलेल्या कामांचा लवकर बोजवारा उडतो आणि केलेल्या कामांचा लाभ देखील होत नाही. त्यामुळे समाजकल्याण विभागामार्फत होणाºया कामांचा दर्जा राखला जावा अशी सुचना चारोस्कर यांनी यावेळी केली. नाशिक तालुक्यातील गणेशगाव येथील रस्ता कॉँक्रीटीकरण करणे हे काम अतिशय निकृष्ठ दर्जाचे झाल्याची तक्रार हिरामण खोसकर यांनी केली. या कामांच्या चौकश्ीची मागणी त्यांनी केली.
या बैठकीस हिरामण खोासकर, सुरेश कमानकर, यशवंत शिरसाठ, रमेश बरफ, कन्हू गायकवाड, विद्या पाटील, शोभा कडाळे उपस्थित होते.