‘तंबाखूमुक्त नाशिक’साठी धावले शेकडो नाशिककऱ़़

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 31, 2018 01:13 AM2018-12-31T01:13:39+5:302018-12-31T01:15:37+5:30

निर्व्यसनी व निरोगी भावी पिढीसाठी गुलाबी व बोचऱ्या थंडीची पर्वा न करता शेकडो नाशिककरांनी कुटुंबीयांसह रविवारी (दि़३०) रात्री ‘तंबाखूमुक्त नाशिक’चा संदेश देत नाइट रनमध्ये सहभाग घेतला़ पोलीस आयुक्त रवींद्रकुमार सिंगल, कॅन्सरतज्ज्ञ डॉ़ राज नगरकर व दहावी बोर्डाच्या नाशिक विभागाचे सचिव नितीन उपासनी यांच्या ‘जॉइन द चेंज’ या संकल्प अभियानाद्वारे महाराष्ट्रात प्रथमच नाइट रनचे आयोजन करण्यात आले होते़ सरत्या वर्षाला निरोप व नवीन वर्षाचे स्वागत तंबाखू व्यसनमुक्तीच्या संदेशाने करून एक नवीन पायंडा पडला आहे़

Nashikkar ran for hundreds of 'Tobaccoless Nashik' | ‘तंबाखूमुक्त नाशिक’साठी धावले शेकडो नाशिककऱ़़

तंबाखूमुक्त नाशिकचा संदेश देण्यासाठी काढण्यात आलेल्या ‘नाइट रन’मध्ये सहभागी झालेले नागरिक़

googlenewsNext
ठळक मुद्देमहाराष्ट्रातील पहिलीच नाइट रननववर्षाचे स्वागत : ‘जॉइन द चेंज’ अभियान

नाशिक : निर्व्यसनी व निरोगी भावी पिढीसाठी गुलाबी व बोचऱ्या थंडीची पर्वा न करता शेकडो नाशिककरांनी कुटुंबीयांसह रविवारी (दि़३०) रात्री ‘तंबाखूमुक्त नाशिक’चा संदेश देत नाइट रनमध्ये सहभाग घेतला़ पोलीस आयुक्त रवींद्रकुमार सिंगल, कॅन्सरतज्ज्ञ डॉ़ राज नगरकर व दहावी बोर्डाच्या नाशिक विभागाचे सचिव नितीन उपासनी यांच्या ‘जॉइन द चेंज’ या संकल्प अभियानाद्वारे महाराष्ट्रात प्रथमच नाइट रनचे आयोजन करण्यात आले होते़ सरत्या वर्षाला निरोप व नवीन वर्षाचे स्वागत तंबाखू व्यसनमुक्तीच्या संदेशाने करून एक नवीन पायंडा पडला आहे़
पोलीस आयुक्त रवींद्रकुमार सिंगल यांनी सांगितले की, तरुणांमधील व्यसनाधीनता व कॅन्सर रुग्णांच्या वाढत्या संख्येस आळा घालण्यासाठी वर्षभरापूर्वी जॉइन द चेंज अभियान सुरू करण्यात आले़ याद्वारे शहरातील विविध शाळा, महाविद्यालये व कंपन्यांमध्ये व्यसनमुक्तीचे विविध उपक्रम राबविण्यात आल्याचे सांगून प्रत्येकाने व्यसनमुक्तीसाठी प्रयत्न करण्याचे आवाहन सिंगल यांनी केले़ डॉ़ राज नगरकर यांनी, गुटखा खाल्ल्याने नऊ वर्षांच्या कॅन्सरग्रस्त मुलाचे आॅपरेशन करण्याची वेळ आल्याने अभियान सुरू केल्याचे सांगितले़ महापौर रंजना भानसी यांनी तंबाखूमुक्त अभियानास शुभेच्छा दिल्या़
पोलीस आयुक्तालय मैदानावर उपस्थित मान्यवरांनी झेंडा दाखविल्यानंतर या पाच किलोमीटर अंतराच्या नाइट रनला प्रारंभ झाला़ प्रारंभी लाखो रुपयांचा गुटखा पकडण्याची कारवाई केलेले उपनगरचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रभाकर रायते व भद्रकालीचे मंगलसिंह सूर्यवंशी यांचा सकार करण्यात आला़ व्यसन सोडलेल्यांचा प्रातिनिधिक सत्कार तसेच जिल्हा रुग्णालयाचे जनजागृती फलकाचे यावेळी उद्घाटन करण्यात आले़ पोलीस आयुक्त कार्यालयापासून सुरू झालेल्या नाइट रनमधील सहभागी झालेल्यांना मेडल व प्रमाणपत्र देण्यात आले़ यावेळी ग्रामीण पोलीस अधीक्षक संजय दराडे, रोहिणी दराडे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी नरेश गिते, उपमहापौर अजिंक्य गिते, स्वामी संविदानंद सरस्वती, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ़ सुरेश जगदाळे, अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉ़ निखिल सैंदाणे, पोलीस उपायुक्त माधुरी कांगणे, श्रीकृष्ण कोकाटे, डॉ़ राजेंद्र नेहेते, मीर मुक्तार अशरफी आदींसह मान्यवर उपस्थित होते़
तंबाखूमुक्तीचे फलक
‘तंबाखू-गुटख्याचा पडता विळखा, कॅन्सरचे ते आमंत्रण ओळखा’, ‘सिगारेटची नशा करी, अनमोल जीवनाची दुर्दशा’, ‘नाही म्हणा तंबाखूला, जवळ करा आरोग्याला’ अशा आशयाचे फलक ‘नाइट रन’मध्ये सहभागी झालेले कुटुंबीय, नागरिक व लहान मुलांच्या हातात होते़
तंबाखूमुक्तीची शपथ
तंबाखू, जर्दा, खर्रा तसेच दुष्परिणामांची मला जाणीव असून, मी जन्मभर या व्यसनांपासून दूर राहील तसेच इतरांनाही व्यसनांपासून परावृत्त करण्यासाठी प्रयत्न करील, अशी शपथ डॉ़ शिल्पा बांगर यांनी यावेळी उपस्थित नागरिकांना दिली़

Web Title: Nashikkar ran for hundreds of 'Tobaccoless Nashik'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.