‘स्मार्ट सिटी’साठी धावले नाशिककर
By admin | Published: December 13, 2015 10:44 PM2015-12-13T22:44:13+5:302015-12-13T23:02:36+5:30
उत्स्फूर्त प्रतिसाद : रोटरी क्लब, सपकाळ हबतर्फे मिनिथॉन स्पर्धा
नाशिक : रोटरी क्लब आॅफ अंबड व सपकाळ नॉलेज हब यांच्या संयुक्त विद्यमाने रविवारी स्मार्ट सिटी संकल्पना मिनिथॉन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेस उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. सकाळी ८ वाजता सुयोजित व्हिरिडियन व्हॅलीज सावरकरनगर येथे या स्पर्धेला प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते हिरवा झेंडा दाखवून प्रारंभ झाला.
याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून पोलिस उपायुक्त श्रीकांत धिवरे, सपकाळ नॉलेज हबच्या कल्याणी सपकाळ, महिंद्राचे उपाध्यक्ष एच. डी. अहेर, मॅग्नम हार्टचे डॉ. मनोज चोपडा, यू. के. शर्मा, दीपक बागड, संतोष दळवी, तुलसी आयचे डी. के. झरेकर, एक्स्प्रेस इनचे शेलार, रोटरी क्लब आॅफ अंबडचे अध्यक्ष उमेश कोठावदे, ललित बूब आदि उपस्थित होते.
या स्पर्धेत सुमारे सहा हजार विद्यार्थी सहभागी झाले होते. स्पर्धा १८ वर्षांवरील खुला गट साडेसात कि.मी. (पुरुषांसाठी), पाच किमी (महिलांसाठी) तसेच शालेय विद्यार्थ्यांचे दोन गटांत घेण्यात आली. यामध्ये १२ ते १४ वयोगट आणि १४ ते १७ वयोगट करण्यात आला. प्रत्येक गटास बक्षीस देण्यात आले. सदर स्पर्धा स्पर्धा सुयोजित व्हिरिडियन व्हॅलीत सावरकरनगर, चोपडा लॉन्स, आसाराम पुलाजवळ आदि मार्गाने घेण्यात आली. तसेच विजेत्यांना रोख स्वरूपात बक्षिसे देण्यात आली. याप्रसंगी अजित भामरे, दादा देशमुख, जे. एम. पवार, संतोष खांगल, भास्कर पवार, मन्सुरी टी. एच. पाटील, जयंत पवार, एन. टी. गाजरे, दत्तात्रय देशमुख उपस्थित होते. (प्रतिनिधी)