एकात्मतेसाठी धावले नाशिककर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 1, 2018 01:52 AM2018-11-01T01:52:04+5:302018-11-01T01:52:26+5:30
: स्वतंत्र भारताचे पहिले उपपंतप्रधान, गृहमंत्री तथा लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांची जयंती व राष्ट्रीय एकता दिनानिमित्ताने राष्ट्रीय एकात्मतेचा संदेश देण्यासाठी शहर पोलीस आयुक्तालयातर्फे ‘एकता दौड’चे आयोजन करण्यात आले होते.
नाशिक : स्वतंत्र भारताचे पहिले उपपंतप्रधान, गृहमंत्री तथा लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांची जयंती व राष्ट्रीय एकता दिनानिमित्ताने राष्ट्रीय एकात्मतेचा संदेश देण्यासाठी शहर पोलीस आयुक्तालयातर्फे ‘एकता दौड’चे आयोजन करण्यात आले होते. पोलीस आयुक्त डॉ. रवींद्रकुमार सिंगल, नाशिक परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक डॉ. छेरिंग दोरजे, महाराष्ट्र पोलीस अकादमीच्या संचालक अश्वती दोरजे यांंंनी झेंडा दाखविल्यानंतर या दौडला प्रारंभ झाला़ राष्ट्रीय एकात्मतेसाठी झालेल्या या दौडमध्ये नाशिककर मोठ्या संख्येने सहभागी झाले होते़ नाशिक ग्रामीण पोलीस दलाच्या वतीने ग्रामीणमध्ये १८ ठिकाणी ही एकता दौड यशस्वीपणे झाली़ पोलीस आयुक्त डॉ़ रवींंद्र सिंगल यांनी राष्ट्रीय एकात्मतेसाठी सर्वांना एकत्र येण्याचे आवाहन केले़ एकता दौडला प्रारंभ होण्यापूर्वी कवायत मैदानावर उपस्थितांनी झुंबा डान्स केला़ या एकता दौडमध्ये सायकलिस्ट असोसिएशनसह सेवाभावी संस्थांचे पदाधिकारी, महाराष्ट्र पोलीस अकादमीचे प्रशिक्षणार्थी, महाविद्यालयीन विद्यार्थी-विद्यार्थिनीही सहभागी झाले होते. महापालिकेच्या शिक्षण मंडळाचे माजी शिक्षणाधिकारी नितीन उपासनी, आंतरराष्ट्रीय धावपटू नंदू उगले सहभागी झाले होते. सुयश हॉस्पिटलचे एक पथक वैद्यकीय सेवेसाठी सज्ज होते. कवायत मैदानापासून प्रारंभ झालेली एकता दौड, गंगापूर रोडमार्गे, विद्याविकास सर्कल, कॉलेजरोड, कॅनडा कॉर्नर, शरणपूर रोडमार्गे पुन्हा कवायत मैदानावर समारोप झाला. सहभागी धावपटूंना मेडल प्रदान करण्यात आले. यावेळी उपस्थितांनी राष्ट्रीय एकात्मतेची शपथही घेतली.
याप्रसंगी पोलीस उपायुक्त विजयकुमार मगर, श्रीकृष्ण कोकाटे, लक्ष्मीकांत पाटील, माधुरी कांगणे यांच्यासह शासकीय अधिकारी, पोलीस अधिकारी उपस्थित होते.
नागरिकांच्या हातात पोलीस उपक्रमांचे फलक नो हॉर्न डे, वाहतूक नियमांचे पालन, मै हूँ डॉन, व्यसनमुक्ती, महिला सक्षमीकरण असे शहर पोलीस आयुक्तालयामार्फत राबविल्या जाणाऱ्या उपक्रमांचे फलक दौडमध्ये नागरिकांच्या हातामध्ये होते़ या दौडमध्ये सेवाभावी संस्थांचे पदाधिकारी, महाराष्ट्र पोलीस अकादमीचे प्रशिक्षणार्थी, महाविद्यालयीन विद्यार्थी-विद्यार्थिनी तसेच वयोवृद्धांपर्यंत सर्व गटातील नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.