नाशिककरांची पर्वणी घरातच

By admin | Published: September 19, 2015 12:07 AM2015-09-19T00:07:23+5:302015-09-19T00:08:17+5:30

वाहिन्यांवरून दूरदर्शन : पावसाने केले स्थानबद्ध

Nashikkar's atmosphere is in the house | नाशिककरांची पर्वणी घरातच

नाशिककरांची पर्वणी घरातच

Next

नाशिक : पहिल्या पर्वणीला पोलिसांच्या अतिरेकी बंदोबस्तामुळे, दुसऱ्या पर्वणीला मौनी अमावस्येला झालेल्या प्रचंड गर्दीमुळे, तर तिसऱ्या पर्वणीला पावसाच्या संततधारेमुळे नाशिककरांना घरातच स्थानबद्ध होत पर्वणी साधावी लागली. बहुसंख्य नाशिककरांनी दूरचित्रवाणीवरील वाहिन्यांवर सुरू असलेल्या बातम्या आणि लाइव्ह प्रक्षेपणाच्या माध्यमातून पर्वणीचा आनंद लुटण्यात समाधान मानले.
सिंहस्थ कुंभमेळ्यातील पहिली पर्वणी दि. २९ आॅगस्टला पार पडली. पहिल्या पर्वणीला कोट्यवधी भाविक शहरात दाखल होतील या भीतीने पोलीस प्रशासनाने शहरभर बॅरिकेडिंग करत नाशिककरांनाही बाहेर पडण्यास निर्बंध घातले. त्यामुळे नाशिककरांनी बाहेर न पडता घरातच राहणे पसंत केले होते. अतिरेकी बंदोबस्ताचा फटका भाविकांना बसल्यानंतर संख्येत घट झाली होती. त्यादिवशी रात्री उशिरा काही नाशिककरांनी गोदाघाट गाठला होता. दुसऱ्या पर्वणीला पोलिसांनी बंदोबस्त सैल केला असला तरी मौनी अमावास्येमुळे लाखोंच्या संख्येने भाविक शहरात आल्याने नाशिककरांनी या गर्दीत न जाणे पसंत केले. रात्री उशिरापर्यंत गोदाघाटावर भाविकांची मोठी गर्दी उसळलेली होती. आता तिसऱ्या आणि शेवटच्या पर्वणीला ऋषिपंचमी असली तरी भाविकांची संख्या घटण्याचा अंदाज व्यक्त केला गेला. त्यामुळे अखेरची का होईना पर्वणी साधण्याचा मनोदय नाशिककरांकडून व्यक्त होत असतानाच वरुणराजाने शुक्रवारी पहाटे जोरदार हजेरी लावली. त्यानंतर पावसाने विश्रांती घेतली नाही. दिवसभर पावसाची रिपरिप सुरूच असल्याने नाशिककरांनी भरपावसात गोदाघाटावर जाण्यास अनुकूलता दर्शविली नाही. त्यामुळे नाशिककरांच्या तुलनेत सायंकाळपर्यंत परगावाहून आलेल्या भाविकांचीच जास्त गर्दी गोदाघाटावर दिसून आली. घराबाहेर पडता न आल्याने बहुसंख्य नाशिककरांनी दूरचित्रवाणीवरून प्रक्षेपित होणाऱ्या बातम्या आणि लाइव्ह कव्हरेज पाहण्याला पसंती दर्शविली.

Web Title: Nashikkar's atmosphere is in the house

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.