सेंद्रिय मालाला नाशिककरांची पसंती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 10, 2019 01:28 AM2019-02-10T01:28:54+5:302019-02-10T01:30:16+5:30

शेतकऱ्यांचा शेतीमाल थेट ग्राहकांनी खरेदी करावा, तसेच ग्राहकांनाही रास्त दरात आणि ताजा शेतमाल उपलब्ध झाला तर शेतकºयांचीही पारंपरिक बाजार व्यवस्थेत होत असलेली कुचंबना थांबण्यास मदत होईल. त्याचप्रमाणे शेतकरी आणि ग्राहक यांच्यात ओळख निर्माण होऊन कायमस्वरूपी शेतीमालासाठी ग्राहक उपलब्ध होतील, या उद्देशाने नाशिक शहरात सुरू असलेल्या कृषिमहोत्सवात पहिल्या दिवसापासून शहरवासीय व शेतकºयांची गर्दी होत आहे.

Nashikkar's choice of organic Malala | सेंद्रिय मालाला नाशिककरांची पसंती

सेंद्रिय मालाला नाशिककरांची पसंती

Next
ठळक मुद्देकृषिमहोत्सव : अन्नधान्य, कडधान्याच्या खरेदीला प्रतिसाद

नाशिक : शेतकऱ्यांचा शेतीमाल थेट ग्राहकांनी खरेदी करावा, तसेच ग्राहकांनाही रास्त दरात आणि ताजा शेतमाल उपलब्ध झाला तर शेतकºयांचीही पारंपरिक बाजार व्यवस्थेत होत असलेली कुचंबना थांबण्यास मदत होईल. त्याचप्रमाणे शेतकरी आणि ग्राहक यांच्यात ओळख निर्माण होऊन कायमस्वरूपी शेतीमालासाठी ग्राहक उपलब्ध होतील, या उद्देशाने नाशिक शहरात सुरू असलेल्या कृषिमहोत्सवात पहिल्या दिवसापासून शहरवासीय व शेतकºयांची गर्दी होत आहे.
कृषी विभाग आणि आत्मा यांच्या वतीने ७ फेब्रुवारी ते ११ फेब्रुवारीदरम्यान सुरू असलेल्या कृषी महोत्सवामध्ये शनिवारी शेतकरी व व्यापाºयांसाठी विक्रेता व खरेदीदार मार्गदर्शन कार्यशाळेच्या माध्यमातून संवाद घडवून आणण्यात आला. दरम्यान, ग्राहकांनी महोत्सवामध्ये सेंद्रिय अन्नधान्यासह फळभाज्या व पालेभाज्या खरेदीला पसंती दिली. अन्नधान्यांमध्ये ग्राहकांना गावरान व सेंद्रिय पद्धतीने उत्पादित केलेल्या तांदूळ, बाजरी, नागली, वरई, गहू यांसह विविध प्रकारच्या डाळी आणि कडधान्य खरेदीला नाशिककरांडून चांगला प्रतिसाद मिळत आहे.
विशेष म्हणजे या कृषिमहोत्सवाला भेट देणाºया नाशिककरांमध्ये बहुतांश नागरिकांनाच शेतीतील आधुनिक तंत्रज्ञान पाहण्यापेक्षा योग्य दरात मिळणारा कृषीमाल खरेदीक डेच अधिक कल असल्याचे दिसून येत आहे.

Web Title: Nashikkar's choice of organic Malala

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.