केबीसीतील प्रमुख आरोपी भाऊसाहेब चव्हाणला जामीन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 19, 2018 10:12 PM2018-05-19T22:12:28+5:302018-05-19T22:12:28+5:30

नाशिक : गुंतवणुकीवर तिप्पट परतावा देण्याचे आमिष दाखवून केवळ नाशिक जिल्ह्यातीलच नव्हे तर राज्यभरातील गुंतवणूकदारांची कोट्यवधी रुपयांची फसवणूक करणाऱ्या केबीसीचा संचालक भाऊसाहेब छबू चव्हाण यास जिल्हा व सत्र न्यायाधीश एस़ टी़ पांडे यांनी शनिवारी (दि़१९) जामीन मंजूर केला़

nashik,KBC,main,accused,Bhausaheb,Chavan,gets,bail | केबीसीतील प्रमुख आरोपी भाऊसाहेब चव्हाणला जामीन

केबीसीतील प्रमुख आरोपी भाऊसाहेब चव्हाणला जामीन

googlenewsNext
ठळक मुद्देएक लाख रुपये वैयक्तिक जातमुचलका

नाशिक : गुंतवणुकीवर तिप्पट परतावा देण्याचे आमिष दाखवून केवळ नाशिक जिल्ह्यातीलच नव्हे तर राज्यभरातील गुंतवणूकदारांची कोट्यवधी रुपयांची फसवणूक करणाऱ्या केबीसीचा संचालक भाऊसाहेब छबू चव्हाण यास जिल्हा व सत्र न्यायाधीश एस़ टी़ पांडे यांनी शनिवारी (दि़१९) जामीन मंजूर केला़

नाशिकमध्ये दाखल गुन्ह्यात एक लाख रुपये वैयक्तिक जातमुचलका तसेच पोलिसांनी चौकशीस बोलविल्यास हजेरी या अटींवर हा जामीन मंजूर करण्यात आला आहे़ केबीसी संचालक भाऊसाहेब छबू चव्हाण, त्याची पत्नी आरती चव्हाण, भाऊ बापूसाहेब चव्हाण, शालक संजय जगताप (निलंबित पोलीस कर्मचारी) यांच्यासह आणखी काही संशयितांवर ११ जुलै २०१४ रोजी आडगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता़

यानंतर महाराष्ट्रच नव्हे तर राजस्थानमधील लाखो गुंतवणूकदारांची कोट्यवधी रुपयांची फसवणूक केल्याचे तपासात समोर आले़ याप्रकरणी केबीसी संचालकांविरोधात महाराष्ट्र ठेवीदार व गुंतवणूकदार हितरक्षण कायद्यान्वये (एमपीआयडी) गुन्हा दाखल करण्यात आला आहे. केबीसी विरोधात आर्थिक गुन्हे शाखेने न्यायालयात दाखल केलेल्या २८९ पानी दोषारोपपत्रात कंपनीने गुंतवणूकदारांना २१२ कोटी १८ लाख ३९ हजार ९८० रुपयांना गंडवल्याचे म्हटले आहे. मे २०१६ मध्ये मुंबई विमानतळावरून सिंगापूरला फरार झालेले भाऊसाहेब व आरती चव्हाण यांना अटक करण्यात आली होती़

तेव्हापासून ते मध्यवर्ती कारागृहात आहेत़ अ‍ॅड़ अविनाश भिडे यांनी न्यायालयात युक्तिवाद करताना सांगितले की, दोषारोपपत्र दाखल असून, त्यामध्ये फेरफार करणे शक्य नाही़ या खटल्यातील साक्षीदारांची संख्या व होणारा विलंब लक्षात घेता दोन वर्षांपासून कारागृहात असलेल्या चव्हाण दाम्पत्यास जामीन देण्याची भिडे यांची विनंती न्यायालयाने मान्य केली़ दरम्यान, चव्हाण दाम्पत्यावर राज्यभरात विविध ठिकाणी गुन्हे दाखल असल्याने त्यामध्ये जामीन मिळत नाही तोपर्यंत त्यांना मध्यवर्ती कारागृहातच राहावे लागणार आहे़

Web Title: nashik,KBC,main,accused,Bhausaheb,Chavan,gets,bail

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.