४२ खेडी पाणीपुरवठा योजना अखेर सुरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 11, 2018 02:34 PM2018-11-11T14:34:58+5:302018-11-11T14:39:27+5:30

गेल्या दोन महिन्यांपासून थकीत वीज बिल आणि नादुरु स्त केबलमुळे बंद असलेली ४२ खेडी पाणी पुरवठा योजना जिल्हा परिषदेने निधी उपलब्ध करून दिल्यानंतर अखेर गेल्या शुक्रवारपासून सुरू करण्यात आली.

nashik,khedi,watersupply,scheme,starts,end | ४२ खेडी पाणीपुरवठा योजना अखेर सुरू

४२ खेडी पाणीपुरवठा योजना अखेर सुरू

Next
ठळक मुद्देनिधी उपलब्ध : ४० ग्रामपंचायतींना पाणीपुरवठाथकीत बिलामुळे या योजनेचा वीज पुरवठा खंडित

नाशिक - गेल्या दोन महिन्यांपासून थकीत वीज बिल आणि नादुरु स्त केबलमुळे बंद असलेली ४२ खेडी पाणी पुरवठा योजना जिल्हा परिषदेने निधी उपलब्ध करून दिल्यानंतर अखेर गेल्या शुक्रवारपासून सुरू करण्यात आली. याप्रकरणी वीज वितरण कंपनीने देखील संवेदनशीलता दाखविल्यामुळे पाणीपुरवठा योजना सुरूळीत होण्यास मदत झाली.
जिल्हा परिषदेने जिल्हा पाणी पुरवठा देखभाल दुरु स्तीमधून १३ लाख रु पयांचा निधी उपलब्ध करून दिल्यामुळे तसेच वीज वितरण कंपनीकडून याकामी पुढाकार घेण्यात आल्याने ४२ खेडी पाणी पुरवठा योजनेंतर्गत नांदगाव व चांदवड तालुक्यातील ४० ग्रामपंचायतींना पाणीपुरवठा करण्यात येतो. मात्र वीज बिलाची रक्कम वारंवार थकीत राहत असल्याने ही योजना बंद पडत आहे. गेल्या दोन महिन्यांपासून थकीत बिलामुळे या योजनेचा वीज पुरवठा खंडित करण्यात आला होता. ऐन दुष्काळी परिस्थितीत पाणी पुरवठा खंडित करण्यात आल्यामुळे ४० गावात पाण्याचा प्रश्न निर्माण झाला होता. अनेक गावांमध्ये टॅकरद्वारे पाणीपुरवठा करण्यात येत होता. ही योजना तत्काळ सुरु करण्याची मागणी करण्यात येत होती. जिल्हा परिषदेच्या स्थायी समतिीतही याबाबत चर्चा झाली होती. जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा शितल सांगळे यांनीदेखील ग्रामीण पाणी पुरवठा विभागाला योजना सुरु करण्यासाठी कार्यवाही करण्याच्या सूचना दिल्या होत्या.
याबाबत जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. नरेश गिते यांनी तत्काळ बैठक आयोजित केली होती यामध्ये वीज वितरण कंपनीचे अधिकारी व पाणी पुरवठा योजनेशी संबंधित सर्व यंत्रणांना बोलाविण्यात आले होते. डॉ. गिते यांनी वीज वितरण विभागाच्या अधिकाऱ्यांनाचालू वीज बिल तसेच मागील थकीत बिलाही रक्कम कमी करून ११ लक्ष ८० हजार देयक भरून वीज जोडण्याची सूचना वीज वितरण विभागास केली होती. वीज वितरण विभागानेही सकारात्मक भूमिका घेतल्याने शुक्र वारपासून ही योजना पूर्ववत सुरु झाली आहे. नागसाक्या धरणातून सदरचा पाणीपुरवठा करण्यात येत आहे.

Web Title: nashik,khedi,watersupply,scheme,starts,end

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.