मविप्र कृषी महाविद्यालयास कुरूगुरू वायूनंदन यांची भेट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 7, 2019 06:55 PM2019-03-07T18:55:45+5:302019-03-07T18:56:37+5:30
नाशिक : मविप्र संचिलत कर्मयोगी दुलाजी सिताराम पाटील कृषी महाविद्यालयात गुरुवारी (दि.५) यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाचे कुलगुरू डॉ.ई.वायुनंदन ...
नाशिक: मविप्र संचिलत कर्मयोगी दुलाजी सिताराम पाटील कृषी महाविद्यालयात गुरुवारी (दि.५) यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाचे कुलगुरू डॉ.ई.वायुनंदन आणि विद्यार्थी सेवा विभाग संचालक डॉ.प्रकाश अतकरे यांनी सदिच्छा भेट दिली.
कृषी महाविद्यालयात यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाचे केंद्र सन २०१८-१९ पासून सुरू झाले असून सदर केंद्रावर ०५ मार्चपासून विविध कृषी विषयाच्या अंतिम परीक्षा सुरु आहेत. कुलगुरूंनी परीक्षा केंद्रास सदिच्छा भेट दिली. यावेळी त्यांनी महाविद्यालयातील विभागांना भेटी देऊन माती व पाणी परीक्षण, बयोफर्टीलायझर प्रोडक्शन ची माहिती घेतली. शेती प्रक्षेत्रावर भेट देऊन सरचिटणीस निलीमा पवार व शिक्षणाधिकारी डॉ.एन.एस.पाटील यांच्या संकल्पनेतून सुरु झालेल्या विषमुक्त भाजीपाला उत्पादनाबाबत कौतुक केले. यावेळी यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्या परीक्षा सीसीटीव्ही अंतर्गत सुरु असल्याबाबत कुलगुरूंनी समाधान व्यक्त केले.
यावेळी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.आय.बी.चव्हाण, कृषी तंत्रिनकेतन चे प्राचार्य प्रा.के.पी.भोये, प्रा.नारायण जाधव, मुक्त विद्यापीठाचे पर्यवेक्षक डॉ.ए.यु.कानडे, प्रा.पी.बी.चौव्हाण उपस्थित होते.