१९ लाख बालकांना टोचणार गोवर लस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 27, 2018 01:38 PM2018-08-27T13:38:17+5:302018-08-27T13:40:30+5:30
नाशिक : बालकांना उद्भवणाऱ्या अनेक जुन्या आजाराचे उच्चाटन झाले असले तरी देशात गोवरची भिती कायम असल्याने जागतिक आरोग्य संघटना आणि जिल्हा आरोग्य विभाग यांच्या माध्यमातून जिल्ह्यात व्यापक लसीकरण मोहिम राबविण्यात येणार आहे. या मोहिमेत जिल्ह्यातील साधारणपणे १९ लाख बालकांना पाच आठवड्याच्या अभियानाद्वारे लसीकरण करण्यात येणार आहे.
अभियान :आजार हद्दपार करण्याची जागतिक मोहिम
नाशिक : बालकांना उद्भवणाऱ्या अनेक जुन्या आजाराचे उच्चाटन झाले असले तरी देशात गोवरची भिती कायम असल्याने जागतिक आरोग्य संघटना आणि जिल्हा आरोग्य विभाग यांच्या माध्यमातून जिल्ह्यात व्यापक लसीकरण मोहिम राबविण्यात येणार आहे. या मोहिमेत जिल्ह्यातील साधारणपणे १९ लाख बालकांना पाच आठवड्याच्या अभियानाद्वारे लसीकरण करण्यात येणार आहे.
मिझल्स अर्थात गोवर या आजाराबाबत ग्रामीण भागात अजूनही पुरेसी जागृकता नसल्याने बालकांना वेळीच लस टोचली जात नाही. त्यामुळे या आजारामुळे अनेक बालके बाधीत होतात आणि उपचाराअभावी किंवा दुर्लक्षामुळे बालकांचा मृत्यू होतो. जागतिक आरोग्य संघटनेचे जिल्हा पर्यवेक्षक डॉ. कमलाकर लष्करे यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित टास्कफोर्स बैठकीत भोवर आजाराची वास्तविकता मांडली. मिझल्स-रुबेला हे देशातील पहिले मोठ्या प्रमाणात राबविण्यात येणारे इन्जेक्टेबल अभियान आहे. दक्षिणपुर्वेच्या देशातून २०२० पर्यंत हा आजार हद्दपार करण्यासाठी विविध देशांमधून प्रयत्न होत आहेत. त्याचाच भाग म्हणून नाशिक जिल्ह्यातही अभिया राबविण्यात येणार आहे.
जिल्ह्यातील ग्रामीण भागात जागतिक आरोग्य संघटनेच्या लसीकरण मोहिम राबविण्यात येणार आहे. गोवमुळे दरवर्षी मृत्यूमुखी पडणाºया १ लाख ३४ हजार बालकांपैकी ४९ हजार बालके भारतातील आहेत. या आजारामुळे कायमस्वरुपी आंधळेपणा लुळेपणा, डायरीया असे दुष्परिणाम दिसून येतात. तर रूबेला संसर्ग गर्भवती महिलेस झाल्यास नवजात बालकास अंधत्व, बहिरेपणा, हृदयविकृती संभवते. त्यामुळे ९ महिन्यांपासून १५ वर्षांपर्यंतच्या किंवा दहावपर्यंतच्या मुलांना अभियानांतर्गत लसीकरण करण्यात येणार आहे. जिल्ह्यातील साधारण १९ लाख बालकांना पाच आठवड्याच्या अभियानाद्वारे लसीकरण करण्यात येणार आहे.
हे अभियान देशातील २१ राज्यांमध्ये यशस्वीपणे राबविण्यात आले आहे. फेब्रुवारी २०१७ पासून आत्तापर्यंत देशातील ९ कोटी ६० लाख बालकांना लसीकरण करण्यात आले आहे. प्रत्येक बालकासाठी वेगळी सुई (इंजेक्शन) वापरले जाणार आहे. एका शाळेत एकाच दिवशी लसीकरण करण्यात येणार असून २०० विद्यार्थ्यांमागे एका प्रशिक्षित कर्मचाºयाची लसीकरणासाठी नियुक्ती करण्यात येणार आहे.
जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित टास्क फोर्सच बैठकीत मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. नरेश गीते, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. सुरेश जगदाळे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. विजय देकाटे, माता बालसंगोपन अधिकारी डॉ. रविंद्र चौधरी आणि अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. दावल साळवे उपस्थित होते.