प्लॉट विक्रीचा व्यवहारात पाऊण कोटींची फसवणूक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 21, 2018 05:33 PM2018-05-21T17:33:01+5:302018-05-21T17:33:01+5:30
नाशिक : प्लॉट खरेदीची संपूर्ण रक्कम घेऊनही खरेदी खत नोंदविण्यास टाळाटाळ करून सुमारे पाऊण कोटी रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे़
नाशिक : प्लॉट खरेदीची संपूर्ण रक्कम घेऊनही खरेदी खत नोंदविण्यास टाळाटाळ करून सुमारे पाऊण कोटी रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे़
सरकारवाडा पोलीस ठाण्यात जयेश जितेंद्र सराफ (४१, शरणपूर रोड,नाशिक) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार २७ जानेवारी २०१६ ते २ मे २०१८ या कालावधीत संशयित आदिश दिलीपकुमार शहा (राग़ुरुद्वारासमोर, नाशिक) यांच्याकडून खडकजांब शिवारातील फायनल ले आऊट असलेला गट नंबर ३३६, ३३७, ३३८ मधील एकूण ४८ प्लॉटची खरेदी केली़ या खरेदीखतापोटी ७१ लाख ३५ हजार रुपयांचा संपूर्ण मोबदला दिला़ मात्र, यानंतर संश्यित आदिश शहा यांनी खरेदीखतावर खरेदीखतावर सही व डावे हाताचा अंगठा देऊन खरेदी खत नोंदविण्यास टाळाटाळ करून विक्री केलेले ४८ प्लॉट द्यावे लागू नये व वाद उपस्थित व्हावा या उद्देशाने फसवणूक केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे़
दरम्यान, या प्रकरणी सराफ यांच्या फिर्यादीवरून सरकारवाडा पोलिसांनी शहा यांच्याविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे़