दापोली पंचायत समिती गिरविणार नाशिक जिल्हा परिषदेचे धडे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 25, 2019 07:00 PM2019-01-25T19:00:16+5:302019-01-25T19:01:29+5:30
नाशिक : मंजूर कामे, त्यांच्या निविदा आणि त्यासाठी देण्यात आलेले कार्यारंभ आदेश आदींसह महत्त्वाची माहिती सर्वसामान्यांसाठी संकेतस्थळावर खुली करण्याच्या ...
नाशिक : मंजूर कामे, त्यांच्या निविदा आणि त्यासाठी देण्यात आलेले कार्यारंभ आदेश आदींसह महत्त्वाची माहिती सर्वसामान्यांसाठी संकेतस्थळावर खुली करण्याच्या नाशिक जिल्हा परिषदेचा उपक्रम दापोलीतही राबविण्यात येण्याची शक्यता आहे. जिल्हा परिषदेच्या उपक्रमांची माहिती घेण्यासाठी आलेल्या दापोलीच्या शिष्टमंडळाने पारदर्शक कारभारासाठी कार्यारंभाची माहिती खुली करण्याच्या नाशिकच्या या उपक्रमाचे चांगलेच कौतुक केले आहे.
नाशिक जिल्हा परिषदेच्या कामकाजाची माहिती घेण्यासाठी रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली पंचायत समिती अंतर्गत महिला लोकप्रतिनिधींनी जिल्हा परिषदेस भेट देऊन विविध उपक्र मांची माहिती घेतली. यावेळी त्यांनी जिल्हा परिषदेकडून राबविण्यात येणाऱ्या विविध उपक्रमांची आणि सुरू असलेल्या कामांची माहिती घेत कुपोषण आणि घरकुलमध्ये जिल्हा परिषदेने केलेल्या कामाविषयी अधिक माहिती जाणून घेतली. या अभ्यास दौºयात त्यांनी जिल्हा परिषदेच्या विविध विभागांमध्ये सुरू असलेले आणि कामात साधलेल्या प्रगतीची माहिती घेतली. राज्यात विविध उपक्रमांमध्ये अग्रेसर काम करणाºया जिल्हा परिषदेच्या कामाचे नियोजन यावेळी त्यांनी जाणून घेतली.
सामान्य प्रशासन विभागाचे उप मुख्य कार्यकारी अधिकारी प्रदीप चौधरी यांनी जिल्ह्यात राबविण्यात आलेल्या कुपोषण निर्मूलन अभियान, घरकुल योजना, मानव संपदा, स्वच्छ सर्वेक्षण आदी उपक्र मांबाबत माहिती दिली. जिल्हा परिषदेमार्फत संकेतस्थळावर नुकत्याच सुरू करण्यात आलेल्या कार्यारंभ आदेशाच्या उपक्र माबाबत सर्व सदस्यांनी जिल्हा परिषदेचे कौतुक करून रत्नागिरी जिल्ह्यातदेखील सदरचा उपक्र म राबविण्यासाठी प्रयत्न करण्यात येणार असल्याचे सांगितले. दापोली तालुक्यात राबविण्यात येणाºया योजनांबाबतही यावेळी चर्चा करण्यात आली. यावेळी दापोली पंचायत समितीच्या सहायक गटविकास अधिकारी सुवर्णा बागल यांच्यासह, जिल्हा परिषद, पंचायत समिती व ग्रामपंचायत सदस्य उपस्थित होते.