अपहारातील २८ लाखांचा मद्यसाठा जप्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 10, 2017 09:36 PM2017-08-10T21:36:31+5:302017-08-10T21:42:26+5:30
पंचवटी : दिंडोरीतील मद्यनिर्मिती कंपनीतून नांदेड जिल्ह्यासाठी पाठविलेल्या लाखो रुपये किंमतीच्या मद्यसाठ्याचा परस्पर अपहार करणाºया ट्रकचालक- मालकासह आठ संशयितांना आडगाव पोलिसांनी अटक केली आहे़ या संशयितांकडून २८ लाख रुपयांचा मद्यसाठा जप्त केला असून संशयितांवर अपहाराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार लॉजीस्टीक ट्रान्सपोर्ट कंपनीचे मालक धर्मेंद्र मंडलोई यांच्या सांगण्यावरून आडगावमधील ओम ट्रान्सपोर्टचे चालक विजय कोठावले यांनी २७ जुलै रोजी दिंडोरीतील परनॉड रकार्ट इंडिया या मद्य कंपनीतून ट्रकचालक पोपट नाथा बागुल याचा मालट्रकमध्ये (एम. एच. १८ एम. २०२८) मध्ये ८४५ विदेशी दारूचे बॉक्स नांदेडला पाठविले़ यानंतर दोन दिवसानंतर ट्रकचालक बागुल यास विचारणा केली असता नांदेड जवळील गोटूर येथे ट्रक नादुरुस्त झाल्याचे सांगितले़
कोठावले यांनी या ट्रकबाबत मंडलोई यांना कळविलेअसता संशय आल्याने मंडलोई हे खाजगी वाहनाने वाटूरकडे गेले व ट्रकची तपासणी केली असता ८४५ पैकी ३७६ बॉक्सचा अपहार झाल्याचे त्यांच्या लक्षात आले़ या प्रकरणी त्यांनी प्रथम मंठा पोलीस ठाण्यात अपहाराचा गुन्हा दाखल करण्यात आला मात्र तो आडगाव हद्दीत घडल्याने तो वर्ग करण्यात आला होता़ पोलिसांनी औरंगाबाद (वैजापूर) येथील ट्रकचालक पोपट बागूल व क्लिनर संदीप गायकवाड यांची कसून चौकशी केली़ त्यांनी ट्रकमालक शेख रऊफ शेख महंमद, मामू उर्फ लतिफ अब्दुल कादीर शेख (विनयनगर), विनय छगन राठोड (गंगाघाट), संजय विठ्ठल सोनवणे (गंगापूर),बाळासाहेब शंकर तांबडे (नवनाथनगर) यांच्या मदतीने मद्याचे बॉक्स केवडीबनातील एका चारचाकीत (एम. एच. १५ अेजी ६६८६) मध्ये लपवून ठेवल्याची कबुली दिली़
आडगाव पोलिसांनी या सात संशयितांना अटक केली असून संजय कांबळे हा फरार आहे़ही कामगिरी पोलीस आयुक्त रविंद्रकुमार सिंघल, पोलीस उपआयुक्त लक्ष्मीकांत पाटील, सहाय्यक पोलीस आयुक्त विजयकुमार चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली आडगाव पोलीस निरीक्षक सुनिलकुमार पुजारी, सहाय्यक पोलीस निरीक्षक काकासाहेब पाटील, मुशीर काझी, संजीव जाधव, दत्ता खुळे, वैभव परदेशी, वैभव खांडेकर, यशवंत गांगुर्डे, अनिल केदार यांनी केली़