कर्जाच्या परतफेडीनंतरही तगाद्यामुळे विवाहितेची आत्महत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 17, 2018 08:22 PM2018-03-17T20:22:54+5:302018-03-17T20:22:54+5:30

नाशिक : दरमहा वीस टक्के व्याजाने घेतलेल्या ३५ हजार रुपयांची परतफेड करूनही आणखी चार लाख रुपयांच्या मागणीसाठी सुरू असलेल्या तगाद्यामुळे जुने नाशिकमधील नाईकवाडीपुरा येथील महिलेने आत्महत्या केल्याची घटना घडली़

nashik,loan,repayment,married,women,sucide | कर्जाच्या परतफेडीनंतरही तगाद्यामुळे विवाहितेची आत्महत्या

कर्जाच्या परतफेडीनंतरही तगाद्यामुळे विवाहितेची आत्महत्या

Next
ठळक मुद्देजुने नाशिकमधील नाईकवाडीपुरा येथील घटना दरमहा वीस टक्के व्याज ; ३५ हजार रुपये

नाशिक : दरमहा वीस टक्के व्याजाने घेतलेल्या ३५ हजार रुपयांची परतफेड करूनही आणखी चार लाख रुपयांच्या मागणीसाठी सुरू असलेल्या तगाद्यामुळे जुने नाशिकमधील नाईकवाडीपुरा येथील महिलेने आत्महत्या केल्याची घटना घडली़ या प्रकरणी महिलेच्या पतीने दिलेल्या फिर्यादीनुसार सावकारासह चौघा संशयितांविरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे़

जुने नाशिकमधील चंद्रकांत भालेराव (६१) यांनी भद्रकाली पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीनुसार ते आपली पत्नी मंजुश्रीसह राहात होते़ मंजुश्री यांनी काही महिन्यांपूर्वी संशयित सविता, ज्योती, रंजिता व रंजिताचा पती देवेंद्र यांच्याकडून ३५ हजार रुपये दरमहा २० टक्के व्याजाने घेतले होते़ या पैशांची व्याजासह परतफेड केल्यानंतर संशयित त्यांच्याकडे चार लाख रुपये मागत होते व त्यासाठी दमदाटी तसेच धमकी देत होते़

या त्रासाला कंटाळून मंजुश्री भालेराव यांनी ५ मार्च २०१८ रोजी विषारी औषध सेवन करून आत्महत्या केली़ संशयितांच्या त्रासामुळेच पत्नी मंजुश्री हिने आत्महत्या केल्याची फिर्याद पती चंद्रकांत भालेराव यांनी पोलिसांत दिली आहे़ या प्रकरणी संशयितांवर महाराष्ट्र व मुंबई सावकारी अधिनियम व आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल केला आहे.

Web Title: nashik,loan,repayment,married,women,sucide

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.