महाराष्टÑ विरूद्ध सौराष्टÑ उद्या रणजी सामना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 13, 2018 06:41 PM2018-12-13T18:41:55+5:302018-12-13T18:44:57+5:30
नाशिक : रणजी स्पर्धेतील महाराष्ट्र तील पाच सामन्यांपैकी एक सामना शुक्रवारपासून (दि. १४) नाशिकच्या हुतात्मा अनंत कान्हेरे (गोल्फ क्लब) मैदानावर ...
नाशिक : रणजी स्पर्धेतील महाराष्ट्र तील पाच सामन्यांपैकी एक सामना शुक्रवारपासून (दि. १४) नाशिकच्या हुतात्मा अनंत कान्हेरे (गोल्फ क्लब) मैदानावर होत आहे. या सामन्यात महाराष्ट्र विरुद्ध सौराष्ट्र आमने सामने आहेत. दोन्ही संघांच्या दृष्टीने हा सामना जिंकणे महत्वाचे असल्याने नाशिककरांना दर्जेदार खेळ बघण्याची संधी यामुळे मिळणार आहे. गुरूवारी सकाळी दोन्ही संघांचे कर्णधार आणि प्रशिक्षकांनी सामना निर्णायक होण्यासाठी मैदानावर उतरणार असल्याचे सांगितले.
गोल्फ क्लब मैदानावर होत असलेल्या महाराष्ट्र विरुद्धसौराष्ट्र रणजी क्रिकेट स्पर्धेसाठी महाराष्ट्र चा संघ संतुलित आणि आत्मविश्वासाने भरपूर असल्याचे प्रशिक्षक प्रशिक्षक सुरेंद्र भावे यांनी सांगितले. संघात अनुभवी केदार जाधव आणि न्युझिलंड येथे चांगली कामगिरी करणारा कर्णधार अंकीत बावणे असल्याने संघ मजबूत असल्याचे त्यांनी सांगितले. या मोसमात महाराष्ट्राच्या खात्यावर सात गुण आहेत तर सौराष्ट्र ने १३ गुण घेऊन आघाडी घेतली आहे. महाराष्ट्र संघ नाशिकच्या मैदानावर किमान डावाची आघाडी मिळविण्यासाठी आटोकाट प्रयत्न करणार असल्याने त्यादृष्टीनेच त्यांनी रणनिती असणार आहे.
महाराष्ट्र चा संघ अंकित बावणे (कर्णधार), स्वप्निल गुगळे, जय पांडे, राहुल त्रिपाठी (उपकर्णधार), चिराग खुराणा, नौशाद शेख, रोहित मोटवाणी (यष्टिरक्षक), अक्षय पालेकर, सत्यजित बच्छाव, अनुपम संकलेचा, समद फल्लाह, मंदार भंडारी, अक्षय दरेकर, निखिल धुमाळ याप्रमाणे आहे
सौराष्ट्रनेदेखील आपल्या संघाची घोषणा केलेली आहे. संघाची मदार असलेल्या जयदेव उनाडकट याचा संघात समावेश आहे. संघात अर्पित वासवधा, जयदेव उनाडकट, शेल्डन जॉन्सन, स्नेल पटेल, हार्दिक देसाई, प्रेरक मंकड, चिराग जानी, अवी बरोट, किशन परमार, धर्मेंद्र जडेजा, हार्दिक राठोड, वंदित जीवराजानी, कमलेश मकवाना, जय चव्हाण, चेतन साकरिया, विश्वराज जडेजा यांचा समावेश आहे.