नाशिकमध्ये महाराष्ट्र  विरुद्ध सौराष्ट्र रणजी सामना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 6, 2018 06:49 PM2018-12-06T18:49:06+5:302018-12-06T18:50:14+5:30

भारतीय क्रिकेट कंट्रोल बोर्डाच्या वतीने नाशिकमध्ये येत्या १४ पासून महाराष्ट्र विरुद्ध सौराष्ट्र असा क्रिकेटचा सामना होणार असून, या सामन्याच्या तयारीला सुरुवात झाली आहे. नाशिकमध्ये होणारा हा नववा सामना असल्याने नाशिककरांमध्ये या सामन्याविषयी प्रचंड उत्सुकता आहे.

nashik,maharashtra,saurashtra,ranjimatch,nashik | नाशिकमध्ये महाराष्ट्र  विरुद्ध सौराष्ट्र रणजी सामना

नाशिकमध्ये महाराष्ट्र  विरुद्ध सौराष्ट्र रणजी सामना

Next
ठळक मुद्देतयारीला वेग : नाशिकचा सत्यजित बच्छाव घरच्या मैदानावर खेळणार


नाशिक : भारतीय क्रिकेट कंट्रोल बोर्डाच्या वतीने नाशिकमध्ये येत्या १४ पासून महाराष्ट्र विरुद्ध सौराष्ट्र असा क्रिकेटचा सामना होणार असून, या सामन्याच्या तयारीला सुरुवात झाली आहे. नाशिकमध्ये होणारा हा नववा सामना असल्याने नाशिककरांमध्ये या सामन्याविषयी प्रचंड उत्सुकता आहे. विशेष म्हणजे नाशिकचा डावखुरा फिरकी गोलंदाज सत्यजित बच्छाव घरच्या मैदानावर खेळणार असल्याने त्याचा खेळ पाहण्याची संधीही नाशिककरांना मिळणार असल्याची माहिती नाशिक जिल्हा क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष विनोद शहा यांनी दिली.
बीसीसीआयच्या वतीने घेण्यात येणाऱ्या रणजी स्पर्धेतील महाराष्ट्रात होणाºया पाच सामन्यांपैकी एक सामना महाराष्ट्र विरु द्ध सौराष्ट्र नाशिकमध्ये दिनांक १४ ते १७ डिसेंबर दरम्यान होणार आहे. या सामन्यात भारतीय संघातील अनेक खेळाडू तसेच आयपीएलमध्ये प्रतिनिधित्व करणारे खेळाडू सहभागी होणार आहेत. महाराष्ट्रकडून केदार जाधव तर सौराष्ट्रकडून जयदीप उनाडकट यांचा समावेश असणार आहे.
सन २००९ पासून सन २०१६ पर्यंत नाशिकच्या हुतात्मा अनंत कान्हेरे मैदानावर एकूण नऊ सामने झाले आहेत. सध्याच्या रणजी मोसमात महाराष्ट्र चार गुण कमविले असून ‘ए’ गटात महाराष्ट्र सातव्या स्थानावर आहे. तर सौराष्ट्र एका विजयासह १३ गुण मिळवून तिसºया स्थानी आहे. या सामन्यासाठी सर्व प्रेक्षकांना विनामूल्य प्रवेश मिळणार आहे. तसेच असोसिएशनच्या सभासदांसाठी स्वतंत्र आसनव्यवस्था केली जाणार आहे. या सामन्यासाठी बीसीसीआयने सामनाधिकारी व पंचांच्या नावांची घोषणा केली आहे.

Web Title: nashik,maharashtra,saurashtra,ranjimatch,nashik

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.