११ पासून महाराष्ट्र राज्यस्तरीय बास्केटबॉल स्पर्धा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 9, 2018 05:43 PM2018-12-09T17:43:44+5:302018-12-09T17:44:32+5:30
नाशिक जिल्हा बास्केटबॉल असोसिएशन आणि महाराष्ट्र बास्केटबॉल असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने नाशिकमध्ये दिनांक ११ ते १६ डिसेंबर दरम्यान वरिष्ठ गटाच्या पुरु ष आणि महिलांच्या महाराष्ट्र राज्यस्तरीय बास्केटबॉल स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेत महाराष्ट्रातील ३७ पुरु ष आणि २७ महिलांचे संघ असे ७८० खेळाडू सहभागी होणार आहेत.
नाशिक : नाशिक जिल्हा बास्केटबॉल असोसिएशन आणि महाराष्ट्र बास्केटबॉल असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने नाशिकमध्ये दिनांक ११ ते १६ डिसेंबर दरम्यान वरिष्ठ गटाच्या पुरु ष आणि महिलांच्या महाराष्ट्र राज्यस्तरीय बास्केटबॉल स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेत महाराष्ट्रातील ३७ पुरु ष आणि २७ महिलांचे संघ असे ७८० खेळाडू सहभागी होणार आहेत.
स्पर्धेचे आयोजन विभागीय क्र ीडा संकुलाच्या हॉलमध्ये होणार असून, या ठिकाणी दोन अद्ययावत क्र ीडांगणे तयार करण्यात आली आहेत. यातील काही सामने जे.एम.सी.टी.च्या मैदानावर आयोजित केले जाणार आहेत. पंच, तांत्रिक अधिकारी असे १०० पदाधिकारी या स्पर्धेकरिता असणार आहेत. या स्पर्धेचे उद््घाटन ११ डिसेंबर रोजी सायंकाळी ५ वाजता होणार आहे. या स्पर्धा भारतीय बास्केटबॉल असोसिएशनच्या नियमावलीप्रमाणे आयोजित केले जाणार आहेत. याप्रमाणे सहभागी संघाचे आठ वेगवेगळे गट तयार करण्यात येणार असून, पाहिले चार दिवस गटवार साखळी सामने होणार आहेत, तर शेवटचे दोन दिवस बाद पद्धतीने सामने खेळविले जाणार आहेत.
या स्पर्धेकरिता महाराष्ट्र राज्य बास्केटबॉल असोसिएशनचे सरचिटणीस गोविंद मुत्थुकुमार , सहसचिव रवींद्र नायर, ललित नाहाटा, उपाध्यक्ष जयंत देशमुख, इतर पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत. पंच म्हणून राष्ट्रीय पंच नासीर खान, शरद बनसोडे, आकाश बाबासोडे, राकेश माहेश्वरी, विजय सोनावणे, राहुल साळवे यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
याचाच एक भाग म्हणून नाशिकमध्ये भारताचा खेळाडू संभाजी कदम त्याचे मार्गदर्शन आयोजित केले होते, तर नुकताच यू.एस.ए.चा प्रख्यात खेळाडू, प्रशिक्षक अलेक्सझांडर स्टर्लिंग याचे सहा दिवसांचे प्रशिक्षण शिबिर आयोजित करून नाशिकच्या खेळाडूंना लाभ करून दिला आहे.
या स्पर्धेच्या यशस्वी आयोजनासाठी नाशिक जिल्हा बास्केटबॉल असोसिएशनचे अध्यक्ष परवेज पिरजादे, उपाध्यक्ष जितेंद्र बेळगावकर, सरचिटणीस जाकीर सय्यद, सहसचिव समीर घोडके, प्रशिक्षक राजेश क्षित्रय, त्याचप्रमाणे मनीषा घोडके, अंकुर गरु ड, भास्कर रंगास्वामी, अंकुर कुलकर्णी, तौफिक खान, राहुल साळवे आदी प्रयत्नशील आहेत.