महारष्ट्र -सौराष्ट्र संघाचे नाशिकमध्ये आगमन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 12, 2018 05:28 PM2018-12-12T17:28:13+5:302018-12-12T17:29:25+5:30
नाशिक : बीसीसीआयच्यावतीने घेण्यात येत असलेलेया रणजी स्पर्धेतील महारष्ट्रतील पाच सामन्यांपैकी एक सामना शुक्रवार दि. १४ पासून नाशिकच्या हुतात्मा ...
नाशिक: बीसीसीआयच्यावतीने घेण्यात येत असलेलेया रणजी स्पर्धेतील महारष्ट्रतील पाच सामन्यांपैकी एक सामना शुक्रवार दि. १४ पासून नाशिकच्या हुतात्मा अनंत कान्हेरे (गोल्फ क्लब) मैदानावर होणार आहे. महारष्ट्र विरूद्ध सौराष्ट्र आमने सामने असून दोन्ही संघाने नाशिकमध्ये आगमन झाले आहे. महारष्ट्रचा संघ मंगळवारी दाखल झाला तर बुधवारी सकाळी सौराष्ट्र संघाचे आगमन झाले. दोन्ही संघांनी सरावाला सुरूवात केली आहे.
शुक्रवार दि. १४ पासून गोल्फ क्लब मैदानावर होणाऱ्या महारष्ट्रविरुद्ध सौराष्ट्र रणजी क्रिकेट स्पर्धेसाठी महारष्ट्रचा संघ जाहीर करण्यात आला असून, संघात केदार जाधवचा समावेश करण्यात आला आहे. महारष्ट्रचा संघ अंकित बावणे (कर्णधार), स्वप्नील गुगळे, जय पांडे, राहुल त्रिपाठी (उपकर्णधार), चिराग खुराणा, नौशाद शेख, रोहित मोटवाणी (यष्टीरक्षक) अक्षय पालेकर, सत्यजित बच्छाव, अनुपम संकलेचा, समद फल्लाह, मंदार भंडारी, अक्षय दरेकर, निखिल धुमाळ, असा संघ जाहीर करण्यात आला आहे.
सौराष्ट्राने देखील आपल्या संघाची घोषणा केलेली आहे. संघाची मदार असलेल्या जयदेव उनाडकट याचा संघात समावेश आहे. संघात अर्पित वासवधा, जयदेव उनाडकट, शेल्डन जॉन्सन, स्रेल पटेल, हार्विक देसाई, प्रेरक मंकड, चिराग जानी, अवी बरोट, किशन परमार, धर्मेन्द्र जडेजा, हार्दीक राठोड, वंदीत जीवराजानी, कमलेश मकवाना, जय चव्हाण, चेतन साकरीया, विश्वराज जडेजा यांचा समावेश आहे.
नाशिकच्या मैदानावर होणारा हा दहावा रणजी सामना आहे. यंदा बीसीसीआयच्या नियमांमुळे सामना आयोजन ते सामना संपेपर्यंत अनेक काटेकोर नियमांची अंमलबजावणी करावी लागणार आहे. यंदाच्या मोसमात झालेल्या रणजी सामन्यात महारष्ट्रने चार गुण कमाविले आहेत व ते ग्रुप ‘ए’ मध्ये सातव्या क्रमांकावर आहे. दुसरीकडे सौराष्ट्र ने एका विजयाची नोंद करीत १३ गुण मिळविले आहे. या गटात सौराष्टÑ तिसºया क्रमांकावर आहे.