शहरातील वीजपुरवठा वारंवार विस्कळीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 4, 2018 02:45 PM2018-05-04T14:45:20+5:302018-05-04T14:45:20+5:30

राज्यात सर्वत्र सुरळीत वीजपुरवठा सुरू असून कुठेही भारनियमन नसल्याचा दावा महावितरणकडून करण्यात आला असला तरी नाशिक शहरात मात्र दररोज वीजपुरवठा विस्कळीत होत आहे. वीजपुरवठा खंडीत होण्यामागचे कारण महावितरणच्या कोणत्याही अधिकाऱ्याला सांगता येत नसल्याने ग्राहक संभ्रमात असून महावितरणकडून छुपे भारनियमन राबविले जात असल्याची शंका उपस्थित केली जात आहे.

nashik,mahavitran,powersupply,disturb | शहरातील वीजपुरवठा वारंवार विस्कळीत

शहरातील वीजपुरवठा वारंवार विस्कळीत

Next
ठळक मुद्देग्राहकांच्या तक्रारी : भारनियमन नसल्याचा दावा वाढत्या उन्हामुळे घरोघरी पंखे आणि कुलर्सचा वापर

नाशिक : राज्यात सर्वत्र सुरळीत वीजपुरवठा सुरू असून कुठेही भारनियमन नसल्याचा दावा महावितरणकडून करण्यात आला असला तरी नाशिक शहरात मात्र दररोज वीजपुरवठा विस्कळीत होत आहे. वीजपुरवठा खंडीत होण्यामागचे कारण महावितरणच्या कोणत्याही अधिकाऱ्याला सांगता येत नसल्याने ग्राहक संभ्रमात असून महावितरणकडून छुपे भारनियमन राबविले जात असल्याची शंका उपस्थित केली जात आहे.
नाशिकचा पारा चाळीस अंशापर्यंत पोहचल्याने कडाक्याच्या उन्हामुळे नाशिककर घामाघुम झालेले आहेत. दिवसेंदिवस उन्हाचा चटका वाढत असल्यामुळे मे मंिहन्यातील ऊन्हाळा नागरिकांना आताच असह्य होऊ लागला आहे. वाढत्या उन्हामुळे घरोघरी पंखे आणि कुलर्सचा वापर मोठ्या प्रमाणात करावा लागत आहे. अशा परिस्थितीत शहरात दररोज कुठे ना कुठे वीजपुरवठा गायब होत असल्यामुळे नाशिककरांना त्रास सहन करावा लागत आहे. विशेषता: गंगापूररोड, शरणपूररोड,महात्मानगर, सातपूर, सिडको तसेच पंचवटीच्या काही परिसरात वीजपुरवठा खंडीत होत असल्याच्या तक्रारी वाढल्या आहेत. नाशिकरोड परिसरातही अनेक भागात काहीवेळ वीजपुरवठा खंडीत होऊन पुर्ववत होत असल्याच्या तक्रारी आहेत. वीजेचा लपंडाव ही आता नित्याचीच बाब झाल्याने नेमकी तांत्रिक अडचण काय आहे याविषयी ग्राहक संभ्रमावस्थेत आहेत.
खंडीत वीजपुरवठ्याचा हा प्रकार रहिवासी आणि व्यावसायिक क्षेत्रातही अलिकडे वाढीस लागला आहे. या संदर्भात वीज कर्मचाºयांना विचारणा केल्यानंतर त्यांना याबाबत पुरेशी माहिती नसते. टोल फ्री क्रमांकावर संपर्क साधल्यानंतर मुख्य कारण कळण्यासाठी ग्राहमाकला किमान तासभर तरी वाट पहावी लागते. टोल फ्री यंत्रणा संपुर्णपणे तांत्रिक असून संबंधित व्यक्तीकडून ग्राहकाला नेमके कारण कधीच सांगितले जात नाही किंबहूना या यंत्रणेला स्थानिक वीजपुरवठ्याच्या बाबतीतल कोणतेही बारकावे माहित नसतात. केवळ थोड्याच वेळात वीजपुरवठा सुरळीत होईल असे सांगितले जाते. वास्तविक ही संपुर्ण यंत्रणा वेळकाढूपणाची आणि परावलंबी असून यामुळे ग्राहकांचे कोणतेही हित साधले गेले नसल्याचे बोलले जात आहे.

Web Title: nashik,mahavitran,powersupply,disturb

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.