नाशकात गोळीबाराची अफवा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 8, 2017 08:01 PM2017-12-08T20:01:15+5:302017-12-08T20:06:59+5:30
नाशिक : म्हसरूळ परिसरात गत काही महिन्यांपुर्वीच झालेल्या एका सराईत गुन्हेगाराच्या खून प्रकरणातील संशयितांचा बदला घेण्यासाठी दोघा संशयितांनी शुक्रवारी (दि.८) दुपारच्या सुमारास गणेशनगरमधील एका दुकानात जाऊन संशयित आरोपीच्या भावावर गोळीबाराचा प्रयत्न केल्याची चर्चा आहे़ दरम्यान, म्हसरूळ पोलिसांशी संपर्क साधला असता असा कोणताही प्रकार घडला नसल्याचे स्पष्ट केले असून गोळीबाराची अफवा असल्याचा खुलासा केला आहे.

गणेशनगर येथील भूषण पगारे याने म्हसरूळ पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीत संशयित विराज पारधी व त्याचा साथीदार यांनी दुपारी दुकानात येऊन काच फोडून नुकसान केल्याचे म्हटले आहे़ या प्रकरणात पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार म्हसरूळ शिवारातील कलानगरमध्ये काही महिन्यांपुर्वी सराईत गुन्हेगाराचा गोळ्या झाडून खून केल्याची घटना घडली होती़ या घटनेतील एक संशयित गणेशनगरमध्ये राहत असून खूनाचा बदला घेण्यासाठी दुपारी पारधी आपल्या साथीदारासह आला होता़ त्यांनी दुकानदाराकडे कुरकुरे पॅकेट मागण्याचा बहाणा केला व त्यानंतर दुकानाची काच फोडून फरार झाले़
दरम्यान, या घटनेनंतर म्हसरूळमध्ये गोळीबार झाल्याची चर्चा संपूर्ण शहरात पसरल्याने म्हसरूळ पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक सुभाषचंद्र देशमुख, सहाय्यक पोलीस निरीक्षक शरदचंद्र शार्दुल, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक संजय पवार, संजय राऊत व पोलिस कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी संपूर्ण चौकशी केल्यानंतर गोळीबाराची अफवा असल्याचे सांगितले.