अल्पवयीन मुलीला पळविणाऱ्यास सक्तमजुरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 30, 2018 10:48 PM2018-07-30T22:48:55+5:302018-07-30T22:49:21+5:30

नाशिक : अल्पवयीन मुलीस फूस लावून पळविणारा मायकल ऊर्फ प्रकाश प्रभाकर जगधने (रा. अश्विनी कॉलनी, सामनगाव रोड, नाशिकरोड) यास जिल्हा व सत्र न्यायाधीश एस़ टी़ पांडे यांनी सोमवारी (दि़३०) सहा महिन्यांच्या सक्तमजुरीची शिक्षा सुनावली़ २२ फेब्रुवारी २०१६ रोजी ही घटना घडली होती़

nashik,minor,girl,kidnapping,accused,conviction | अल्पवयीन मुलीला पळविणाऱ्यास सक्तमजुरी

अल्पवयीन मुलीला पळविणाऱ्यास सक्तमजुरी

googlenewsNext
ठळक मुद्देसहा महिन्यांच्या सक्तमजुरीची शिक्षा

नाशिक : अल्पवयीन मुलीस फूस लावून पळविणारा मायकल ऊर्फ प्रकाश प्रभाकर जगधने (रा. अश्विनी कॉलनी, सामनगाव रोड, नाशिकरोड) यास जिल्हा व सत्र न्यायाधीश एस़ टी़ पांडे यांनी सोमवारी (दि़३०) सहा महिन्यांच्या सक्तमजुरीची शिक्षा सुनावली़ २२ फेब्रुवारी २०१६ रोजी ही घटना घडली होती़

नाशिकरोडच्या महापालिका शाळेजवळून सकाळी ९ वाजेच्या सुमारास आरोपी जगधने याने अल्पवयीन मुलीचा पाठलाग करून तिला फूस लावून पळवून नेले होते़ याबाबत मुलीच्या आईने दिलेल्या फिर्यादीनुसार नाशिकरोड पोलीस ठाण्यात अपहरण, विनयभंग व लहान मुलांचे लैंगिक अपराधापासून संरक्षण (पोस्को) कायद्यान्वये गुन्हा दाखल केला होता़ महिला पोलीस उपनिरीक्षक बी. आर. धनेश्वर यांनी या गुन्ह्याचा तपास करून २० एप्रिल २०१६ रोजी जिल्हा न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले.

न्यायधीश पांडे यांच्या न्यायालयात सुरू असलेल्या खटल्यात सरकारी वकील आऱ एम़ कोतवाल यांनी साक्षीदार तपासून पुरावे सादर केले़ त्यानुसार आरोपी जगधने यास भादंवि ३५४ (ड) अन्वये दोषी धरून सहा महिने सक्तमजुरी, एक हजार रुपये दंड, दंड न भरल्यास एक महिना सक्तमजुरीची शिक्षा सुनावली़ पोलीस हवालदार के. एस. दळवी, एम. के. माळोदे, पोलीस नाईक शिंदे यांनी आरोपीला शिक्षा होण्याच्या दृष्टीने पाठपुरावा केला.

Web Title: nashik,minor,girl,kidnapping,accused,conviction

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.